संदीप सिंहवर No Comment! मंदिर उघडणे आणि ई-पासबाबत काय म्हणाले संजय राऊत

संदीप सिंहवर No Comment! मंदिर उघडणे आणि ई-पासबाबत काय म्हणाले संजय राऊत

सुशांत सिंह प्रकरणात संदीप सिंह याचं नाव आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट: राज्यात अनलॉक 4 सुरू होणार असून तरी देखील सरकार धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेत नाही आहे. राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना मंदिरं का बंद आहेत, असा सवाल करत विरोधकांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणात संदीप सिंह याचं नाव आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.. यावर मात्र संजय राऊत यांनी बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा...गणपती आणि मोहोरमच्या ताझिया एकाच मंडपात.. पाहा हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन

संजय राऊत म्हणाले, राज्यात ताळेबंदच्या संदर्भात नवीन नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल. यात राज्याच्या जनतेचा पूर्ण विचार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील. देऊळ उघडणे असो की ई-पासबाबत मुख्यमंत्री जनतेचा हिताचा निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाच काही काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. पण आज काँग्रेसमधील भलेही वाद होत असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

शाळा-महाविद्यालयांबाबत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिल्लीतील केंद्र सरकारच्या नेत्यांच्या संपर्कात असून याबाबत विद्यार्थी हिताचा विचार केला जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.

राज्यातले विरोधी पक्ष नेत्यांनी फिरलं पाहिजं. सरकारच्या काही त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात. राज्याचे मुख्यमंत्री वर्षा शासकीय निवासस्थानी, सह्याद्री अतिथीगृह इथे थांबून जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या अधिकारी यांच्याशी संपर्कात असून संकट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधकांनी संकट परिस्थितीत सहकार्य करायला हवं, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा... प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर हादरलं प्रशासन, पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त

संदीप सिंहवर No Comment!

सुशांत सिंह प्रकरणात संदीप सिंह याचं नाव आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यावर मात्र संजय राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून यावर फारसे भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: August 30, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या