मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? काय म्हणाले संजय राऊत

शिवसेनेकडे 170 आमदारांची यादी आहें आणि शिवतीर्थावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री शपथ घेणार असा दावाही राऊतांनी केला होता.

  • Share this:

मुंबई 4 नोव्हेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते रामदास कदम हेही सोबत होते. राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं याला महत्त्वाचं मानलं जातंय. राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट होती. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली. आम्ही एका मर्यादेत राहून चर्चा केली. लवकरात लवकरच सरकार स्थापन व्हावं अशी विनंती आम्ही केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेना अडथळा ठरणार नाही असं आम्ही सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या वतीने आम्ही भेटलो. उद्धव ठाकरे यांची आणि बाळासाहेब ठाकरे यांची काही पुस्तकं आम्ही राज्यपालांना भेट दिली अशी माहितीही राऊत यांनी दिली. बाळासाहेबांचं फटकारे हे पुस्तकही राज्यपालांना दिली.

राज्यात जो काही पेच निर्माण झाल त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही असंही आम्ही त्यांना सांगितलं. राजभवन हे राजकारणाची जागा नाही. आम्ही राज्यपालांना सूचना देणार नाही. ते अतिशय अनुभवी नेते आहेत असंही राऊत यांनी सांगितलं. राज्यपालांसोबत 1 तास चर्चा झाल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला नकोत का? असा प्रश्न जेव्हा संजय राऊतांना विचारला गेला त्यावर राऊत म्हणाले, असं काहीही आम्ही सांगितलं नाही आणि कुणी आमच्या कानातही असं काही सांगितलं नाही. अशा गोष्टी आम्ही करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'...सफर मे मजा आता है'

निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवस उलटून गेले तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. भाजप-शिवसेनेमध्ये अद्याप चर्चाच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली आहे. तर भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. यामुळे दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेतून भाजपला थेट इशाराच दिला आहे. शिवतिर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, सोमवारी संजय राऊत राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी केलेल्या ट्विटने पुन्हा नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शाह नाराज, मुख्यमंत्रिपदावर तडजोड नाही

संजय राऊत यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअऱ केला आहे. जय हिंद असा कॅप्शन दिला आहे. तसेच फोटोवर 'लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है!' असं लिहिलं आहे. आतापर्यंत शिवसेनेनं त्यांची भूमिका ठामपणे मांडली आहे. आता काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीआधी फोटो शेअर केल्यानं राज्याच्या राजकारणातील सत्ता स्थापनेची वाटचाल कशी होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. '...सफर मे मजा आता है'

भाजपवर टीका

गेले काही दिवस शिवसेनेकडून भाजपवर डागण्यात येणाऱ्या तोफगोळ्यांची जबाबदारी राऊत हे सांभाळत आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांनी भाजपला घायाळ केलं असून राऊत दररोज नवनवीन दावे करत असल्याने मोठी कोंडी निर्माण झालीय. शिवसेनेकडे 170 आमदारांच बहुमत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल असं वक्तव्य त्यांनी रविवारी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं महत्त्वाचं मानलं जातंय.

BREAKING : शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात, बड्या नेत्याने केला खुलासा

शिवसेनेकडे 170 आमदारांचं संख्याबळ

धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 170 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.

राऊतांवर संघाच्या मुखपत्राची टीका

'सामना' दैनिक आणि पत्रकार परिषदांमधून रोज भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार 'नागपूर तरुण भारत'च्या अग्रलेखातून आज घेण्यात आलेला आहे. पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ देत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता 'बेताल' असा करण्यात आला आहे. तसंच विदूषक अशीदेखील त्यांची संभावना करत संजय राऊत हे राज्यात महायुतीचे सरकार आणण्यास आडकाठी ठरत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

'सेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात', आमदाराचा खळबळजनक दावा

'राज्यात दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्यांचे दुःख वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही हे ही तितकच जळजळीत वास्तव आहे' असे अग्रलेखात म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे यांची राजकीय समज त्यांची परिपक्वता समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडिकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे' अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलेली आहे.

'...सफर में मजा आता है', संजय राऊत यांचे सूचक ट्विट

'बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राचे सुटका करण्यासाठी घालवली हा बेताल मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. 1990 पासून निवडून आलेल्या जागांचा संदर्भ देत शिवसेना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळाचा संदर्भ देत होती मग ते आता मुख्यमंत्रिपदाबाबात कसा दावा करु शकतात,' असा सवालही या अग्रलेखातून विचारण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या