आता संजय राऊत म्हणाले , लवकरच येईल Good News!

आता संजय राऊत म्हणाले , लवकरच येईल Good News!

बाबरी मशीद पाडण्याचे काम सैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले होते.

  • Share this:

मुंबई,9 नोव्हेंबर- सु्प्रीम कोर्ट आज (शनिवार) बहुचर्चित अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निकाल देणार आहे. आजचा निकाल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस राजकीय गोड बातमीचा (Good News) नसून त्यापेक्षाही मोठी गोड बातमी येईल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांनी संबोधित करताना सांगितले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देशात एकमेव नेता होते, त्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले होते. बाबरी मशीद पाडण्याचे काम सैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी छातीठोकपणे सांगितले होते. बाळासाहेब या खटल्यातून निर्दोष सुटले होते, असेही राऊत म्हणाले.

अयोध्येला आम्ही जाऊन आलो. हा विषय सातत्याने लावून धरून शिवसेनेने सरकारवर दबाव कायम ठेवला. त्यास उद्धव ठाकरे यांचेही योगदान तितकेच महत्त्वाचे आहे तितके बाळासाहेबांचे. शरयू नदीत पाणी कमी आणि रक्त जास्त होते, शुभ कार्यक्रम सुरूवात आज होईल. पीएम यांना मागणी अध्यादेश काढा ही मागणी सेनेनी केली. पण त्यांनी मान्य केली नाही. अयोध्येत मंदिर होणार असेल तर त्यात शिवसेनेचा योगदान आहे. शिवसेनेचे खासदार मंदिर यासाठी पुन्हा अयोध्येला जातील, असेही राऊत यांनी सांगितले.

राऊतांचा भाजपाला टोला....

आता जे राम मंदिरविषयी बोलतात, ते त्यावेळेस बाबरी पाडली यावर बाळासाहेब ठाकरे यांनी एकमेव जोरदार समर्थन केले होते. कोणी एका संघटना योगदान नसल्याचे सांगत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवेदनातून खोटेपणा राग बाहेर पडला. आम्ही शुक्रवारी हा विषय संपवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. खोटे ठरवण्याचे प्रयत्न जे करतील त्याबाबत ठाकरे बोलले. ढोंगी राजकारण 70 वर्षांत नव्हे तितके आता झाले. त्यावर ठाकरे कडाडले. राजकारण निवडणूक पुरते. राम मंदिर हा आमचा मु्ददा नाही, भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. राम मंदिर होईल तर त्याचा पाया, वीट शिवसेनेची होती इतके योगदान नक्कीच, जे आता बोलतात त्यावेळेस खाकावरून गायब झाले यावर आता जास्त बोलायच नाही- राऊत

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading