शिवसेनेच्या या नेत्याने शरद पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट, वेगळीच चर्चा सुरू

शिवसेनेच्या या नेत्याने शरद पवारांच्या घरी जाऊन घेतली भेट, वेगळीच चर्चा सुरू

राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना संजय राऊत यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई,31 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना संजय राऊत यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र,पवारांची भेट ही सदिच्छा असल्याची माहिती राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापने संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. आता सत्ता स्थापनेसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते कधी चर्चा सुरु करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या हालचालींकडेही राज्याचे लक्ष आहे.

शिवसेनेने घेतली राज्यपालांची भेट

राज्यात सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. सत्तेतल्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मान-अपमानाचे नाट्य सुरू आहे. निकाल लागून सहा दिवस झालेत तरी अजून राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. ही सगळी पार्श्वभूमी असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेणं राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलं आहे. ही भेट राज्यातल्या ओळा दुष्काळाविषयी असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जातंय मात्र या भेटीला राजकीय किनार असून हा दबावाचा भाग असल्याचीही चर्चा आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालावी अशी आम्ही त्यांना विनंती केली. राज्यापालांनीही लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय. सरकारं बनतील आणि बिघडतील पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

काँग्रेस नेते दिल्लीत...

राज्यातील काँग्रेस प्रमुख नेते गुरूवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण आदी प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत भेट होण्याची शक्यता आहे.

VIDEO:राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading