मुंबई, 6 सप्टेंबर: 'मातोश्री' हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान आहे. दाऊदच काय किंवा त्याचा बापानं जरी धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरत नाही!, अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा.... दाऊदच्या पत्नीशी संबंध! हॅकरला भेटले फडणवीस; खडसेंनी केला 'त्या' रात्रीचा खुलासा
एकनाथ शिंदे म्हणाले, स्वत: दाऊद दुसऱ्यांच्या आश्रयानं राहत आहे. मातोश्री सोडून द्या शिवसैनिकाच्या केसालाही कोणाला धक्का देऊ शकत नाही. यापूर्वीही अशा धमक्या पाकिस्तानातून आल्या होत्या. अशा पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.
उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईहून अज्ञात व्यक्तीनं फोन करून ही धमकी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बॉम्बनं उडवून देण्याची फोन करणाऱ्यानं धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीनं 3 ते 4 फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती समोर आली आहे.
मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री11 च्या सुमारास 4 फोन काॉल दुबईच्या नंबरवरून आले. फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस आॉपरेटरने घेतले होते. कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिस सुरक्षा कमी केली होती. मात्र, आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉल नंतर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा...लघुशंकेला जातो असं सांगून कोरोनाबाधित रुग्ण गेला हॉस्पिटलच्या टेरेसवर अन्...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बॉंम्बनं उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.