मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर, म्हणाले...

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर, म्हणाले...

'मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी पक्ष शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या विरुद्ध बोलणार नाही.'

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोंबर :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजप आणि शिवसेनेला घरचा अहेर दिलाय. भाजप आणि शिवसेनेचे नेते 220 ते 230 जागा मिळतील असा दावा करत असताना मनोहर जोशी यांनी मात्र एवढ्या जागा मिळणार नाहीत असं म्हटलंय. महायुती 200 जागा पार करणार नाही असं मला वाटतं असंही जोशी यांनी सांगितलं. कुठला नेता दावा करतोय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असंही ते म्हणाले. मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी पक्ष शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री येणार असंही ते म्हणाले. शरद पवार आणि माझे संबंध चांगले असले तरी ते करत असलेल्या सर्वच गोष्टी योग्य आहेत असं नाही असंही ते म्हणाले. आदित्य ठाकरे एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि शिवसेनेतही महत्त्वाची भूमिका स्वीकारतील असंही त्यांनी सांगितलं.

मतदान करा: 'मिसळी'वर ताव मारा आणि 'हेअर कट'ही करा अगदी मोफत

मतदान केंद्रांवर अनोखं स्वागत

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आयोगाने अनेक उपक्रम राबवले आहेत. मुंबईतल्या भायखळा इथलं मतदान केंद्र रांगोळ्या आणि फुग्यांनी सजविण्यात आलंय. मतदान केंद्रबाहेर अतीशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्राच्या प्रवेश व्दारावर फुग्यांची सजावट करण्यात आलीय. तर विदर्भातल्या यवतमाळमध्ये मतदारांचं औक्षण करण्यात आलंय. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारे मतदानकेंद्र सजविण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदारांना केलं 'हे' आवाहन, पाहा VIDEO

यवतमाळ शहरातील नगर परिषदच्या संजय गांधी शाळेच्या मतदान केंद्रावर प्रशासनाच्यवतीने तहसीलदार रुपाली बेहरे यांनी मतदारांचे जोरदार स्वागत केलं. एवढच नव्हे तर त्यांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प  देऊन त्यांचं स्वागत केलं तसच त्यांना कापडी पिशवी ही देण्यात आली.  या ठिकाणी  एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे त्याला पंख आहे आणि या माध्यमातून मतदार येऊन त्यांचा मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यामागचा दुहेरी उद्देश आहे. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 09:51 AM IST

ताज्या बातम्या