सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेच्या 'या' नेत्याचं सरसंघचालकांना साकडं

सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेच्या 'या' नेत्याचं सरसंघचालकांना साकडं

किशोर तिवारी हे आधी भाजपच्या जवळ होते. नितीन गडकरी यांचे ते समर्थक समजले जातात.

  • Share this:

मुंबई 5 नोव्हेंबर : महाराष्ट्रातला सत्तेचा पेच आता निर्णायाक टप्प्यावर आलाय. भाजप आणि शिवसेनेतली कोंडी कायम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढतेय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर परिस्थितीने निर्णयाक वळण घेतलंय. परिस्थिती चिघळत असताना शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून राज्यातल्या सत्तेचा पेच सोडविण्यासाठी साकडं घातलंय. जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलंय त्यामुळे तुम्हीच पुढाकार घेऊन पेच सोडवा असं तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. भाजप युतीधर्माचं पालन करत नाही असंही त्यांनी म्हटलंय. किशोर तिवारी हे आधी भाजपच्या जवळ होते. नितीन गडकरी यांचे ते समर्थक समजले जातात.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे तिवारी यांचं सरसंघचालकांना लिहिलेलं पत्र चर्चेत आलंय. निवडणुकीच्या आधी पदांचं समसमान वाटप केलं जाईल असं ठरलेलं असतानाही भाजप तो शब्द पाळत नाही. जे ठरलं होतं त्याचं पालन व्हायला पाहिजे. भाजपनेच आता शब्द फिरवल्याने पेच निर्माण झालाय. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने तुम्हीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे कान धरा असंही त्यांनी मोहन भागवतांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

EXCLUSIVE शरद पवार-सोनिया गांधी बैठकीत तयार झाला सत्ता स्थापनेचा 'प्लान'

पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार

महाराष्ट्रातला सत्तेचा पेच आता निर्णायाक टप्प्यावर आलाय. भाजप आणि शिवसेनेतली कोंडी कायम आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढतेय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर परिस्थिती आणखी बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत नवीन सरकार स्थापन करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कोंडी फोडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. थायलंडमधल्या 'आरसेप' परिषदेला उपस्थित राहून पंतप्रधान रात्री उशीरा दिल्लीत दाखल झालेत. त्यामुळे आज दिल्लीतून मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.

'शिवसेना पक्षप्रमुखांना खोटं ठरवलं जातंय', संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिवसभर दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नितीन गडकरी आणि इतर नेत्यांची भेट घेऊन राज्यातल्या घडमोडींवर चर्चा केली. मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार असंही बोललं जात होतं. मात्र ते रात्रीच मुंबईत दाखल झालेत.

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या सेनेला 'या' अटी, तर काँग्रेस म्हणते...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले की ते पुन्हा एकदा सोनिया गांधींना भेटणार असून त्यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. याचा अर्थ कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे असे संकेत मिळताहेत. त्यामुळे सोनिया गांधीं आणि पवारांच्या दुसऱ्या भेटीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता राज्यातील सत्ता स्थापनेचा निर्णय हा दिल्लीत होईल हे स्पष्ट झालंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 5, 2019, 12:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading