मुंबई, 08 सप्टेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत या ना त्या मुद्यावरून वाद सुरूच आहे. आता चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून वाद पेटला आहे. शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे (nitesh rane) यांनी हे लक्षात घ्यावे या जत्रेत नारायण राणे (narayan rane) देखील होते, मग ते महायेडे होते का? असा पलटवार पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी केला आहे.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत भाजप आणि नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
'किरीट सोमय्या हे अतिहुशार आहेत. धमकी येत असेल तर ते कधी पोलीस स्टेशनला जात नाही. ते थेट मीडियाकडे जातात आणि आपल्याला धमकी आल्याचं सांगता. ते पोलिसांकडे न जाता मीडियासमोर का जातात? असा सवाल उपस्थितीत करत गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांना टोला लगावला.
आता बिनधास्त खा आवडीचे पदार्थ! मसाल्याचे 'हे' घरगुती पदार्थ Acidity करतील दूर
तसंच, काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत असताना शिवसेनाही येड्याची जत्रा आहे, असा टोला लगावला होता. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, 'शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे, या जत्रेत नारायण राणे देखील होते, राणे हे सेनेत मोठे झाले, मग ते महायेडे होते का? असा सवालच पाटील यांनी विचारला.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारने MSP बद्दल घेतला मोठा निर्णय
तसंच, जळगाव जिल्ह्यात केळी पिकाची नुकसानीची उर्वरित भरपाई द्यावी, तसंच या पावसात चाळीसगाव जामनेर या ठिकाणी झालेल्या नुकसानीची मदत तातडीने द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केली असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Narayan rane, Nitesh rane, Shivsena, गुलाबराव पाटील, नारायण राणे, नितेश राणे, शिवसेना