Home /News /mumbai /

BREAKING : राज्यात उद्या राजकीय भूकंप? आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत

BREAKING : राज्यात उद्या राजकीय भूकंप? आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेबद्दल आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली

    मुंबई, 14 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून  महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहे. त्यावर 'आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू' असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनीही भाजपविरोधात संघर्षाचे संकेत दिले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप केला. काही दिवसांपूर्वीच प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊत यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेची मोठी घोषणा केली आहे. (Multibagger Stocks: शेअर बाजारात पडझडीदरम्यान 'हे' शेअर्स 500 टक्क्यांपर्यंत वाढ) या पत्रकार परिषदेबद्दल शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली.  'आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंग काय करायची ते पाहू' असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच, मुंबई आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. याबद्दलची मी माहिती घेतली, मुंबई पोलिसांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे, आता सर्व सुरळीत आहे, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद पाहावी - संजय राऊत दरम्यान, प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर राऊत यांनी आज पुन्हा एकदा ईडीविरोधात एल्गार पुकारला आहे. (UPSC Tips: 12वी नंतरही सुरु करू शकता UPSC ची तयारी; या वयापर्यंत देता येईल Exam) 'महाराष्ट्रच्या जनतेचं लक्ष उद्या माझ्या पत्रकार परिषदेकडे हवं. उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे. जनतेला माझी उद्याची पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. केंद्रीय तपस यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनी ऐकायला हवी. उद्या शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र,मराठी माणूस बोलणार आहे,  तुमचे धंदे उद्या बंद होतील' असा इशाराच राऊत यांनी दिला आहे. 'उद्या स्वतः पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांचं या पत्रकार परिषदेवर लक्ष असेल, त्यांच्या मार्गदर्शनात ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, त्यांना खोलायला किती वेळ लागतो? ते पोकळ आहेत, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या