आदित्य ठाकरेंनी टाळला 'खूर्ची'चा मोह...या मंत्र्यांचीही झाली 'गोची'

आदित्य ठाकरेंनी टाळला 'खूर्ची'चा मोह...या मंत्र्यांचीही झाली 'गोची'

शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना आश्वासन दिले.

  • Share this:

दिनेश केळूसकर,(प्रतिनिधी)

रत्नागिरी,3 नोव्हेंबर: युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा दौरा केला. मान्सूनोत्तर पावसामुळे कोकणात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शिवसेना खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना आश्वासन दिले. विशेष म्हणजे वेंगुर्लेत मच्छीमारांशी संवाद साधताना आदित्य यांनी खूर्ची टाळून ते चक्क जमिनीवर बसले. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर यांनाही खाली बसावे लागले.

सध्या जे राजकीय चर्चा सुरु आहे. 'कोण कुणाबरोबर आहे', हे कुणी विचारले तर कुणीही कोणासोबत असले तरी शिवसेना तुमच्यासोबत असल्याचा उद्धवजींचा निरोप घेऊन मी आलोय, असे आदित्य यांनी यावेळी सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. या प्रश्नासे थेट उत्तर देणे टाळत सध्या नुकसान भरपाई महत्त्वाची असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

भाजपचं टेंशन वाढणार; उद्धव ठाकरेंकडे बहुमताची यादी..

विधानसभेचे निकाल लागून आता 9 दिवस होताहेत. मात्र सत्ता स्थापनेची शक्यता अजून दिसत नाहीये. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर अडीचवर्ष मुख्यमंत्रीपद हवच अशी शिवसेनेची भूमिका असल्याने सत्तास्थापनेचा गाडा 'वाटणी'च्या रस्सीखेचात फसला आहे. धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्यांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले आहेत असंही त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या