मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते, सेनेच्या नेत्यांचं मोठं विधान

शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते, सेनेच्या नेत्यांचं मोठं विधान


शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पार पडली.

शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पार पडली.

शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पार पडली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जुलै : महाविकास आघाडी सरकारमध्ये  (mva goverment) एकीकडे काँग्रेसने (congress) स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीने (ncp) राज्यभरात दौरे सुरू केले आहे. आता त्यानंतर शिवसेनेनं (Shivsena)  सुद्धा शिवसंपर्क मोहिम (shivsamparka) हाती घेतली आहे. 'शिवसेना नेहमीच निवडणूक साठी तयार असते यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही' असं सूचक विधान शिवसेनेचे सचिव अनिल देसाई (anil desai) यांनी केलं.

शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पार पडली. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दाम्पत्यांमधील Truth & Dare चा खेळ ठरला जीवघेणा; पत्नीचा मृत्यू तर पती ICU मध्ये

'शिवसंपर्क मोहीम हे शिवसेनेचा हा नेहमीचा उपक्रम आहे. आज जिल्हाप्रमुख 50 च्या आत संख्या होती. दोन बॅचमध्ये चर्चा झाली. आज दुसरी लाट नियंत्रणात तरीही धोका कायम आहे. याच भान ठेवून गर्दी न होता कार्यक्रम संरचना असते, नवीन मतदार नोंदणी असते, निवडणूक पूर्वतयारी असते यासाठी शिवसंपर्क मोहीम राबवणार आहे, असं देसाई यांनी सांगितलं.

तसंच, 'माझं गाव कोरोनामुक्त गाव यातून गाव पातळीवर घराघरात पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे, असा एक व्यापक कार्यक्रम आहे. हे सर्व कोरोना नियमाला धरूनच असणार आहे' असंही देसाई म्हणाले.

हा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार, युवराजची भविष्यवाणी

'पक्षप्रमुख नेहमीच मार्गदर्शन करतात. आमदार खासदार ते शिवसैनिकांपर्यंत ते मार्गदर्शन करतात लोकांचा विश्वास आहे संघटना बळकटीकरण करणं गरजेचं आहे असं स्फूर्ती येणारं आजचं मार्गदर्शन होतं. मुळात शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही' असंही देसाई म्हणाले.

 उद्धव ठाकरेंचा कामाला लागण्याचा आदेश

तसंच, 'तुम्ही आघाडी किंवा युती होणार का.? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड 19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं. अशीच चांगली कामं पुढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव कोरोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत.  राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, मी तुमच्या पाठीशी आहे.' अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली.

First published: