मुंबई, 14 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेनं लढवण्याची घोषणा केली आहे. परंतु, निवडणूक आयोगाने 'बिस्कीट' चिन्ह दिल्यामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे शिवसेनेनं आयोगाकडे चिन्ह बदलून द्यावी अशी विनंती केली होती. अखेर आता सेनेला शोभणारे चिन्ह मिळाले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेची मागणी मान्य केली असून 'तुतारी वाजवणारा मावळा' हे चिन्ह दिले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला 'बिस्कीट' हे चिन्ह दिले होते. शिवसेनेने या चिन्हावर नापसंती व्यक्त केली होती.
मुंबई बत्ती गूल प्रकरणी धक्कादायक माहिती, सायबर हल्ल्याची होती शक्यता
तसंच निवडणुकीचे चिन्ह बदलून द्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असं शिवसेनेनं निवडणूक आयोगाला सुचवले होतं. पण ही तीनही चिन्ह आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी 'तुतारी वाजवणारा मावळा' हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे मंगळवारी कळवलं आहे.
भोसले राजघराण्याच्या 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला, VIDEO
निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला शिवसेनेची पसंती दर्शवली आहे. शिवसेनेची बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता. शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही.
तसंच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होता. आमची मते शिवसेनेला जातात असा JDU चा आक्षेपचा मुद्दा होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य ठरवत शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणा ऐवजी दुसरे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 'तुतारी वाजवणारा मावळा' या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.