मीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

शिवतीर्थावर शिवसेनेचा विराट असा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. दुष्काळ, स्वबळाचा नारा आणि राम मंदिराच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील हे ठळक मुद्दे....

  • Share this:

(उदय जाधव)मुंबई, 18 आॅक्टोबर : शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर शिवसेनेचा विराट असा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. दुष्काळ, स्वबळाचा नारा आणि राम मंदिराच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील हे ठळक मुद्दे.

चांगलं काम करण्यासाठी छाती नाही, हिंमत पाहिजे. मनगटात जोर पाहिजे. उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल.

सरकार भाववाढ रोखण्यास अपयशी. विष्णुचा अकरावा अवतार तुमच्यासोबत असतानासुद्धा तुम्हाला महागाई रोखता येत नाही. हे कसलं सरकार ?

एकदाचं सांगा मंदिर केव्हा बांधायचंय ते. तुम्ही सांगा नाही तर आम्ही बांधतो. त्याचीच आठवण करून द्यायला मी अयोध्येत जातोय. २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार.

सरकारमध्ये धमक नाही. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दुष्काळ का जाहीर करत नाही. लवकरच दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकारविरूद्ध आंदोलन करणार.

सतत वल्लभभाई पटेलांचं नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता. पाकिस्तानचे तुकडे करा. फक्त सोईचं राजकारण करता.

खोटं बोलणं हे मराठी माणसाची संस्कृती नाही. खोटं बोलणं हा कोडगेपणा आहे. हा स्पष्टवक्तेपणा नाहीत तर कोडगेपणा आहे. नितीन गडकरींचं वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका.

महिलांवर अत्याचाराचे आरोप होताय हे सहन न करण्यापलीकडे आहे. मीटू मोहिमेत महिलांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. मीटूमध्ये आरोप करण्याआधी, अत्याचार करण्याऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा, शिवसेना तुमच्यासोबत आहे.

३७० कलमाबद्दल भाजपच्या नेत्यामध्ये बोलण्याची हिंमत आहे का? 3७० कलम रद्द करा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराला उतरेल.

सगळ्या बंदी आणि नियम फक्त हिंदूंनाच का ? हे थेरं बंद केले पाहिजेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 10:06 PM IST

ताज्या बातम्या