ऑफरची वेळ गेली, आता इंद्रपद दिलं तरी माघार नाही.. सेनेचा भाजपला टोला

ऑफरची वेळ गेली, आता इंद्रपद दिलं तरी माघार नाही.. सेनेचा भाजपला टोला

सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे नवं समीकरण जुळत असताना...

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकच विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर अडीच नव्हे तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी दैनिक 'लोकसत्ता'च्या वृत्ताचे खंडन केले आहे. नव्या ऑफरची वेळ निघून गेली, सेल संपला आहे. मुख्यमंत्रिपदाचे काय इंद्रपद दिलं तरी आता माघार नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप टोला लगावला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे नवं समीकरण जुळत असताना अखेरचा प्रयत्न म्हणून भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले होते. मात्र, भाजपकडून आम्हाला अशी कोणतीही ऑफर नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

अडीच नव्हे तर पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री...

महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी सकाळी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्त्व करावे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात एकमत झाल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, महाराष्ट्राला लवकरच कणखर नेतृत्त्व मिळणार आहे. महाराष्ट्रात शिवसैनिकच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shiv sena
First Published: Nov 22, 2019 11:24 AM IST

ताज्या बातम्या