एक दिवस सरकारचाही आकस्मिक मृत्यू होईल - शिवसेना

shiv-sena-criticize-on-fadnavis Government-on-farmers-debt-waiver-and-farmers-suicide in Samana

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2017 11:21 AM IST

एक दिवस सरकारचाही आकस्मिक मृत्यू होईल - शिवसेना

18 एप्रिल : 'नव्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून दूरदर्शनवर गप्पा मारत आहे. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडवल्याशिवाय राहणार नाहीत,' असा सूचक इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जमाफीवरून शिवसेनेने आजच्या 'सामना'तून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

विरोधात असताना फडणवीस हे आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत होते. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा रंग बदलल्याची टीका सेनेने केली आहे. विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचा त्यांनाच आता विसर पडला आहे. मुख्यमंत्री स्वतःला तरी गांभीर्याने घेत असतील तर ‘मी तोच देवेंद्र फडणवीस आहे व शब्दाला जागणारा आहे’ असे त्यांनी दाखवून द्यायला नको?, असा सवाल करत कर्जमाफीची मागणी केली. रामजी आणि रत्नमालाचे शाप, सरकारच्या मृत्यूची आकस्मिक नोंद!...

फडणवीस यांनी सुरू केलेल्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमावरही शिवसेनेने टीकास्त्र सोडले. या कार्यक्रमातून फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना या गेल्या २५ वर्षांत अनेकवेळा आलेल्या आहेत. पण शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज असल्याचे सेनेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...