Home /News /mumbai /

मुंबईत आणखी एका तरुणाच्या आत्महत्येमुळे खळबळ, भाऊ घरात असताना घेतला गळफास

मुंबईत आणखी एका तरुणाच्या आत्महत्येमुळे खळबळ, भाऊ घरात असताना घेतला गळफास

चेंबूर येथील सुमननगर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांचा मुलगाअभिषेक श्रीकांत शेट्ये याने राहत्या घरात आत्महत्या केली.

    मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली असं सांगितलं आहे. ही घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग 155 चे शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांचा मुलगा अभिषेक श्रीकांत शेट्ये (वय 25) याने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. अभिषेक याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री 9 वाजता ही घटना उघडकीस आली. हेही वाचा - अखेर मुंबई लोकल सुरू झाली, रेल्वे मंत्र्यांनी केलं जाहीर चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत शेट्ये कुटुंबीय राहत आहे. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्यांचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कित्येक वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याला खोलीत बघायला गेलं असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हेही वाचा - गेल्या 24 तासांत कोरोनाचा देशात हाहाकार, असे आहेत आताचे अपडेट अभिषेकने आत्महत्या केल्यामुळे भावाला एकच हादरा बसला. त्याने याची माहिती कुटुंबीयांना दिली. अभिषेकला तत्काळ त्यांनी चेंबूरच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. अभिषेकने आत्महत्या का केली, याची कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे. गळफास लागल्यामुळे सुशांतचा मृत्यू दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली.   सुशांतचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. यात सुशांतचा मृत्यू हा गळफास लागल्यामुळेच झाला असं अहवालात स्पष्ट झालं आहे.  पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या