मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

गळती थांबेना! ठाणे, नवी मुंबईनंतर आता या महापालिकेत शिवसेनेला मोठा दणका

गळती थांबेना! ठाणे, नवी मुंबईनंतर आता या महापालिकेत शिवसेनेला मोठा दणका

शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.

    मुंबई, 08 जुलै : ठाणे, नवी मुंबईनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेनेला धक्का बसणार आहे. या महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवकही शिंदे गटात सामील होणार आहेत. काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट घेतलेल्या नगरसेवकांची संख्या जवळपास 40 असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्येही स्थानिक पातळीवर शिवसेनेला खिंडार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देत कल्याण, डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश सर्व नगरसेवक आणि नगरसेविका तसेच शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक व युवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्राचा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले. हे वाचा - मंत्रिमंडळ विस्ताराआधी दिल्लीत खलबतं, मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेचे एकूण 54 नगरसेवक आहेत. त्यातील 40 नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे जवळपास निश्चित आहे. नंदनवन येथे भेट घेऊन या नगरसेवकांनी जाहीर समर्थन दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे नगरसेवकांसोबत शिवसेनेचे इतर नेते आणि पदाधिकारी, युवा सेना अधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला मोठी खिंडार पडण्याची शक्यता आहे. हे वाचा - सोमय्यांसोबतची दुश्मनी दोस्तीत बदलली? प्रताप सरनाईक म्हणतात.... दरम्यान, शिंदे गटाची ताकद वाढत असून शिवसेना पक्षाची वाताहात सुरू आहे. पक्षाची गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. या अगोदर ठाणे आणि नवी मुंबईतही शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Dombivali, Eknath Shinde, Kalyan

    पुढील बातम्या