बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केली म्हणून सेना नगरसेवकाची नागरिकाला मारहाण

बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केली म्हणून सेना नगरसेवकाची नागरिकाला मारहाण

बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून कल्याणच्या शिवसेना नगरसेवक मोहन उगले आणि त्याच्या समर्थकांनी एका नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडलीये

  • Share this:

2 मे: बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून कल्याणच्या शिवसेना नगरसेवक मोहन उगले आणि त्याच्या समर्थकांनी  एका नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडलीये. अशोक शिंदे असं मारहाण झालेल्या नागरिकाचं नाव आहे.

लाल चौकीजवळील शिंदे मळा परिसरात राहणाऱ्या विठाबाई शिंदे यांनी स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांच्याविरोधात आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत पत्रकारांना देण्यासाठी अशोक शिंदे दुपारी महापालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी महापालिका मुख्यालय परिसरातच नगरसेवक मोहन उगले आणि शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. आणि अचानक नगरसेवक उगले यांनी शिंदे यांना जोरदार ठोसा लगावला. त्यानंतर उगले यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या समर्थकांनेही शिंदे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर शिंदे आणि उगले दोघेही जण आपापली तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्यावर दोनच दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्यात एट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 07:30 PM IST

ताज्या बातम्या