कल्याणमधील मतपेट्या गायब? शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

कल्याणमधील मतपेट्या गायब? शिवसेनेच्या तक्रारीनंतर आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

कळवा मुंब्रा विधानसभेतील मतपेट्या काल रात्रीच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या स्ट्रॉंग रुममध्ये पोहोचणे अपेक्षित होते. पण त्या अद्याप कळव्यातच...

  • Share this:

कल्याण, 30 एप्रिल: कल्याण लोकसभेतील कळवा मुंब्रा विधानसभेतील मतपेट्या अद्याप डोंबिवलीतील स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचल्या नसल्याची माहिती शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली होती. याबाबत तिथल्या माहितीत काही तफावत होती, जी दूर झाली असून या पेट्या आज सकाळऐवजी आज संध्याकाळी स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचत आहेत, अशी माहिती कल्याण लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबने यांनी दिली आहे. यात काहीही संशयास्पद किंवा चूकीचे नसून हा प्रोसिजरचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काल (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 17 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले होते. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता. कल्याणमध्ये 44.27 टक्के मतदान झाले होते. तर राज्यातील 17 मतदारसंघात सरासरी 57 टक्के मतदान झाले होते. मतदारसंघातील मुंब्रा विधानसभेतील 322 मतपेट्या पोहोचल्या नसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या मतपेट्या काल रात्रीच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या स्ट्रॉंग रुममध्ये पोहोचणे अपेक्षित होते. पण त्या अद्याप कळव्यातच होत्या. त्यामुळे या मतपेट्या गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. पण यासंदर्भात निवडणूक अधिकारी शिवाजी कादबने यांनी काहीही संशयास्पद किंवा चूकीचे नसल्याचे सांगितले. हा आयोगाच्या प्रोसिजरचा भाग असून मतपेट्या सकाळऐवजी संध्याकाळी स्ट्राँग रुममध्ये पोहोचतील, असे ते म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे.

VIDEO: असा षटकार मारा की मोदी देशाबाहेर जातील- नवज्योत सिंग सिद्धू

First published: April 30, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading