आमचं ठरलंय; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा!

आमचं ठरलंय; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा!

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थोड्याचवेळा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असेल तरी या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे स्पष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीवर असताना आणखी एक मोठी बातमी येत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खुद्द संजय राऊत यांनीच फोनवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा घडवून आणली आहे. राज्यात विधानसभेचे निकाल लागून 14 दिवस झाले तरी शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तास्थापनेची कोंडी काही केल्या सुटत नाहीय. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या आधी ठरलेल्या प्रमाणे सत्तेत वाटा मागितला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना तडजोड करण्यास तयार नाही. तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपदावर तडजोड करायची नाही. भाजपने उपमुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सेनेला देण्याची तयारी दाखवली आहे. पण शिवसेना मात्र मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे.

काल भाजपकडून शिवसेनेसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी आधी ठरल्याप्रमाणे करा अशी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. शिवसेनेची ही भूमिका पहिल्या दिवसापासून संजय राऊत मांडत आहेत. राज्यातील या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात काही बिघडले तर राष्ट्रवादी काँग्रेस सेनेच्या मदतीला पोहोचू शकते. तसे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील दिले आहेत. या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची फोनवर झालेली चर्चा महत्त्वाची ठरते. या दोन्ही नेत्यांनी फोनवर काय चर्चा केली याबाबत माहिती मिळाली नसली तरी ही चर्चा सत्तास्थापने संदर्भातच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीच्या प्रस्तावासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. याआधी राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला तर पाच वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल.

गडकरींच्या भेटीनंतर अहमद पटेल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading