मोदी, अमित शहा आणि फडणवीसांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे, पत्रकार परिषदेतले 15 महत्त्वाचे मुद्दे

खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं, RSS ने आता स्पष्ट सांगावं. शिवसेनेच्या हिंदुत्वात खोटं बोलणं नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 07:19 PM IST

मोदी, अमित शहा आणि फडणवीसांबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे, पत्रकार परिषदेतले 15 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई 8 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. मला खोटं ठरविणाऱ्या माणसाशी मला बोलायचं नाही असं सांगत त्यांनी भाजपवरच खोटेपणाचा आरोप केला. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटा असू शकत नाही. हे महाराष्ट्रापुढे जाहीर करा असं आवाहनही त्यांनी केलंय. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली सर्व भूमिका आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहांसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही जाहीर केला. आमच्याशी गोड बोलून आम्हाला खोटं ठरवण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. आम्ही चर्चेची दारं बंद केलेली नाहीत. त्यांनी फक्त खोटेपणावर स्पष्टीकर देत खुलासा करावा असंही ते म्हणाले. हरियाणात दुष्यत चौटाला मोदींना वाट्टेल ते बोलतात आणि त्यांच्याशी युती होऊ शकते. मात्र अमित शहा किंवा दिल्लीतून कुणीही बोलायला आलं नाही असंही ते म्हणाले.

भाजप-सेना युती तुटली? देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले 21 मोठे मुद्दे

त्यांच्या पत्रकार परिषदेतले हे महत्त्वाचे 15 मुद्दे

खोटेपणा सहन करणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलणार नाही हा महाराष्ट्राला विश्वास आहे.

तुमचे पर्याय खुले असतील तर मला कशाला थांबवता ?

Loading...

काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी सत्तास्थापनेसंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा केलेली नाही.

बहुमत नसताना भाजपचं सरकार कसं येणार?

हो मी देवेंद्र फडणवीसांशी बोललो नाही. कारण..

मला खोटं पाडणाऱ्या माणसाशी बोलणार नाही.

'आम्हालाही त्यांच्या भाषेत उत्तरं देता येतात पण...', फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं, RSS ने सांगावं

ठरलं होतं, पण देऊ शकत नाही असं म्हटले असते तर चाललं असतं. खोटं बोलायला मी भाजपचा नाही.

मोदी मला लहान भाऊ मानतात. मी मोदींबद्दल कधीच वाईट बोललो नाही - उद्धव

खोटं कोण बोलतंय हे जनता बघते आहे. भाजपला मी मित्रपक्ष म्हणूनच लोकसभेत युती केली. पण निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेला अवजड उद्योग खातं दिलं.

हो! शिवसेनेनं चर्चा थांबवली. फडणवीस चांगले मित्र. ते मुख्यमंत्रिपदावर होते, म्हणूनच पाठिंबा दिला होता.

शिवसेना प्रमुखांचा मुलगा खोटा बोलतोय हे मला चालणार नाही. फडणवीसांकडून अशी अपेक्षा नव्हती.

मोठी घडामोड : अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा आशीर्वादाची गरज नाही

आमचं काय ठरलं होतं? अमित शहा आणि फडणवीस आमच्याकडे आले आणि चर्चा केली पदांचं समसमान वाटप करण्याचं ठरलं होतं.

युतीसंदर्भात चर्चा थांबली होती, हे खरं. शिवसेननेनं दिलेला शब्द पाळला. पहिल्यांदाच शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...