शिवसेना ऑन अॅक्शन; उद्धव ठाकरेंनी बोलवली खासदारांची बैठक

शिवसेना ऑन अॅक्शन; उद्धव ठाकरेंनी बोलवली खासदारांची बैठक

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विभागवार खासदारांची बैठक सोमवारी बोलवल्याचे समजते.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही हे जवळ जवळ निश्चित झाल्याचे मानले जात आहे. किमान शिवसेना तरी तशी भूमिका घेताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका तोडावर आहेत. त्यामुळे शिवसेनेने निवडणुकीच्या तयारी सुरुवात केली आहे. याचे संकेत सेनेतील सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या विभागवार खासदारांची बैठक सोमवारी बोलवल्याचे समजते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने न लढलेल्या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची आढावा या बैठकीत उद्धव ठाकरे घेणार आहेत. एकूणच शिवसेनेने मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या पाठोपाठ लोकसभेची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.

शिवसेनेने 2014च्या लोकसभा निवडणुकीत 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. तेव्हा त्यांची भाजप सोबत युती होती. सेनेने 2014मध्ये 18 जागांवर विजय मिळवला होता. पण त्यानंतर सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेची आघाडी होऊ शकली नव्हती. निवडणुकीनंतर मात्र दोन्ही पक्ष एकत्र आले.

शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असले तरी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी देखील युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी विभागवार खासदारांची बैठक बोलवल्याचे समजते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

VIDEO: काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; दहशतवादी लपलेले घर उडवले

First published: January 26, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading