मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच नाव; राज्य सरकारने काढलं परिपत्रक

थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच नाव; राज्य सरकारने काढलं परिपत्रक

आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे

आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे

आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 14 जानेवारी : 'थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.' राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray is now in the list of great personalities) आता महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आणि विरोधी पक्ष भाजप यांचे याबाबत कशी प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष आहे. 2021 मध्ये राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत 15 डिसेंबर 2020 चे परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार 2021 मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यात आली आहे. या यादीत आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray is now in the list of great personalities) हे ही वाचा-'आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट'; अखेर रेणू शर्मानं सोडलं मौन दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)चे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तसंच नवाब मलिक (Nawab Malik) वादात सापडले आहेत, त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यापुढच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
First published:

Tags: Balasaheb thorat

पुढील बातम्या