'युती'ची अडलेली जागावाटापाची चर्चा पुन्हा सुरू होणार, मात्र शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'वर ठाम

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे रविवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या आधी तरी शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 08:01 PM IST

'युती'ची अडलेली जागावाटापाची चर्चा पुन्हा सुरू होणार, मात्र शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'वर ठाम

विवेक कुलकर्णी, मुंबई 19 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानंतर आता भाजप-शिवसेनेची अडलेली जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जागावाटप लवकरात लवकर करण्याचे आदेश दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा करणाऱ्या नेत्यांना दिले आहेत. मात्र शिवसेना अजूनही फिफ्टी-फिफ्टी च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचंही बोललं जातंय. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून (20 सप्टेंबर) ही चर्चा सुरू होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे रविवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या आधी तरी शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पुन्हा स्वबळाचा नारा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेत युतीबाबत एक चकार शब्द तर काढलाच नाही उलट राम मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता शरसंधान साधलं. त्यामुळे राज्याची विधानसभा भाजप पुन्हा स्वबळावर तर लढणार नाहीना  या शक्यतेला अधिक बळ मिळू लागलं आहे.

महाराष्ट्राचा महासंग्राम : केजमध्ये विमल मुंदडांचा वारसा पुढे नेणार का?

पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या मुद्यावरून सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव न घेता कसा टोला लगावला. आता तुम्ही म्हणाल, पंतप्रधानांच्या या विधानाचा उद्धव ठाकरेंशी काय संबंध...त्यांनी कुठे त्यांच नावं घेतलं...पण युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यापासून स्वतः उद्धव ठाकरेंनीच तिनदा हा मुद्दा उकरून काढला. या माध्यमातून भाजपवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण स्वतः पंतप्रधानांनीच सुप्रीम कोर्टाकडे अंगुलीनिर्देश करून फक्त हा मुद्दाच निकालात काढला नाही तर मित्रपक्ष शिवसेनेलाही अप्रत्यक्ष इशाला दिला. गंमत म्हणजे युतीबाबत अख्ख्या भाषणात एक चकार शब्द न उच्चारणाऱ्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं मात्र तोंड भरून कौतुक केलं. नाशिकच्या सभेत मोदी फक्त मुख्यमंत्र्यांचं कौतुक करूनच थांबले नाहीतर राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालं हे सांगायला ते विसरले नाहीत.

Loading...

पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू, राष्ट्रवादीचा पलटवार

लोकसभेत युतीसाठी शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणारी भाजप विधानसभेत मात्र, स्वबळावर लढणार अशी शंका स्वतः उद्धव ठाकरेंनाच होती. म्हणूनच ते त्यावेळीच विधानसभेबाबत बोला असं सातत्याने भाजपला ऐकवत होते. पण भाजपने पुढचं पुढं बघू म्हणून वेळ मारून नेली. आताही जागावाटपात शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर अडून बसलेली असताना भाजप मात्र त्यांना 110 च्यावर जागा सोडायला तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...