मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार' महापौर किशोरी पेडणेकर

'कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार' महापौर किशोरी पेडणेकर

Shiv Sena BJP workers clash near Shiv Sena Bhavan Mumbai: मुंबईत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं पहायला मिळालं.

Shiv Sena BJP workers clash near Shiv Sena Bhavan Mumbai: मुंबईत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं पहायला मिळालं.

Shiv Sena BJP workers clash near Shiv Sena Bhavan Mumbai: मुंबईत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं पहायला मिळालं.

मुंबई, 16 जून: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या जमीन व्यवहारावरुन शिवसेनेने (Shiv Sena) केलेल्या टीकेवरुन भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले. आक्रमक झालेले भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते थेट शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan) आंदोलनासाठी दाखल झाले आणि याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिकही (Shivsainik) घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला.

या संपूर्ण घटनेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, "मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे? शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार आणि त्याचा हा भाग असेल. सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेने केलेल्या टीकेच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना भावनावर फटकार मोर्चा काढला होता. राम मंदिर प्रकरणी आरोप आणि शिवसेनेने केलेल्या टीकेच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. सेना भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सेना भवन परिसरात दाखल झाले.

घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले मात्र, कार्यकर्ते काही ऐकायला तयार नव्हते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं.

First published:

Tags: BJP, Mumbai, Shiv sena