Home /News /mumbai /

शिवसेना भवन पुढील 3 दिवस राहणार बंद, कारण...

शिवसेना भवन पुढील 3 दिवस राहणार बंद, कारण...

निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन पुढील 3 दिवस बंद राहणार आहे.

    मुंबई, 23 जून : मुंबई कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दादर परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील शिवसेना भवन पुढील काही दिवसांसाठी खबरदारी म्हणून बंद करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत शिवसैनिकांकडून गरजू आणि गरिबांना मदत पुरवली जात आहे. त्यामुळे शेकडो शिवसैनिक सध्या मदतकार्याचे काम करत आहे. अनेक शिवसैनिकांची शिवसेना भवनावर ये जा सुरू असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिवसेना भवन पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शिवसेना मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे. मुंबईकरांनी मोडले नियम दरम्यान,  मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचं खापर प्रशासनावर फोडलं जात आहे. मात्र, या परिस्थितीला मुंबईकरच जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 मार्चपासून ते 21 जूनपर्यंत मुंबई पोलिसांनी 8950 मुंबईकरांवर नियम न पाळल्याप्रकरणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यात सर्वांत जास्त प्रमाण उत्तर मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम मुंबईमध्ये आहे. मुंबईकरांनी लॉकडाऊन आणि अनलॉकचे सर्व नियम मोडले आहेत. गेल्या 48 तासांत तब्बल 262 मुंबईकरांनी अनलॉकचे नियम मोडले आहेत. मास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत 66, मध्य मुंबई 471, पूर्व मुंबई 149, पश्चिम मुंबई 435 तर उत्तर मुंबई 353 जणांवर कारवाई केली आहे. अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 92 मुंबईकरांना मुंबई पोलिसांनी खाक्या दाखवला आहे. संपादन - सचिन साळवे
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या