Home /News /mumbai /

शिवसैनिकांनी शिव'प्रसाद' दिला आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांनी भाजपला सुनावले

शिवसैनिकांनी शिव'प्रसाद' दिला आता शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, संजय राऊतांनी भाजपला सुनावले

राम मंदिरासंदर्भात काही आरोप केले. तुम्हाला काही लिहिता वाचता येते की नाही. शिक्षणाचा काही गंध आहे की नाही'

    मुंबई, 17 जून : 'ज्यांनी कुणी शिवसेना भवनावर (Shivsena bhavan) चाल करून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे. आता हे प्रसादापुरताच मर्यादित राहु द्या. त्यांना शिवभोजन थाळी आणून देण्याची वेळ आणू नका' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भाजपला सुनावले आहे. तसंच, 'हा विषय संपलेले आहे, आमच्याकडूनही विषय संपला आहे' असंही राऊत म्हणाले. बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. या प्रकरणावर संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडत भाजपला सुनावले आहे. 'शिवसेना भवनावर हल्ला वगैरे काही झाला नाही. शिवसेना भवनावर हल्ला करण्यात कुणाची हिंमत नाही. एक टोळकं तिथे आलं होतं. शिवसेना भवन हे महाराष्ट्राचे अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा स्मारक आपण जे अस्मितेचं प्रतिक म्हणून पाहतो, तशीच ही वास्तू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू आहे. मराठी अस्मितेचं प्रतिक आहे आणि तुम्ही त्याच्यावर चाल करून गेले. राम मंदिरासंदर्भात काही आरोप केले. तुम्हाला काही लिहिता वाचता येते की नाही. शिक्षणाचा काही गंध आहे की नाही' असं राऊत यांनी भाजपला सुनावलं. साधं दूध पिण्यापेक्षा असं प्या दररोज; डायबेटीज रुग्णांसाठी जास्त फायदा 'सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलं आहे, आधी ते नीट तर वाचा. जे जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहे, त्याची चौकशी व्हावी आणि  जर खोटे असेल तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं स्पष्ट म्हटलं आहे. आम्ही भाजपनेच घोटाळा केला असं कुठेचं म्हटलं नाही. राम मंदिर ही स्वायत्त संस्था आहे. खुलासा विचारणे हा गुन्हा झाला आहे. जे आरोप झाले आहे, त्यावर खुलासा मागितला तो गुन्हा आहे' असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला. 'ज्यांनी कुणी शिवसेना भवनावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे. आता हे प्रसादापुरताच मर्यादित राहु द्या. त्यांना शिवभोजन थाळी आणून देण्याची वेळ आणू नका. हा विषय संपलेले आहे, आमच्याकडूनही विषय संपला आहे' असंही राऊत यांनी भाजपला बजावलं. PHOTOS :कियारा अडवाणीचं टॉपलेस फोटोशूट; चाहते म्हणाले 'हाय गर्मी..' 'भाजपचे प्रमुख स्वबळावर निवडणूक लढवण्याचे बोलत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, पण ते स्वबळाची भाषा करत आहे. आपला पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे काही गैर नाही. आता उरले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावे लागेल', असं सूचक विधानही राऊत यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या