• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • "राम मंदिर बांधा नाहीतर 'राम नाम सत्य' केल्याशिवाय राहणार नाही"

"राम मंदिर बांधा नाहीतर 'राम नाम सत्य' केल्याशिवाय राहणार नाही"

शिवसेनाने सामना या त्यांच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जर राम मंदिराचं काम लवकरात लवकर सुरू झालं नाही तर पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपची पराभूतता निश्चित आहे, असं शिवसेनेनं सामनातून भाजपला सुनावलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर : शिवसेनेने सामना या त्यांच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. जर राम मंदिराचं काम लवकरात लवकर सुरू झालं नाही तर पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे, असं शिवसेनेनं सामनातून भाजपला सुनावलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेनं सामनातून लिहिलं की, "केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. राष्ट्रपतींपासून उत्तर प्रदेशच्या राज्यपालापर्यंत, पंतप्रधानांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली आहे? बाबरीवर हातोडा शिवसैनिकांनी मारला. बाबरी उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. आता तुमचे राज्य आले तर राम मंदिर तरी उभारा. नाहीतर हिंदू समाज खोटारड्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही." या संपादकीयमध्ये लिहिण्यात आलं आहे की, बाबरी मशिदीला शिवसेनेनं तोडलं आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जबाबदारी घेतली होती. आता केंद्रात भाजप सरकार आहे, मग राम मंदिर बनवण्यासाठी इतका विलंब का लागत आहे असा सवाल विचारण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं म्हटलं आहे की, लवकरात लवकर राम मंदिर उभं राहणं राहिलं पाहिजे नाहितर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता भाजपला मत देणार नाही. सामनात पुढे लिहिलं आहे की, भाजपने सत्ता येण्याआधी राम मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं होतं पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. असं म्हणत सामनातून आज भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. VIDEO : मुलीची छेड काढणाऱ्याला जमावाने चोपले; तरूणाचा मृत्यू
  First published: