Home /News /mumbai /

संजय राऊतांनी कापला संभाजीराजेंचा पत्ता, सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधूनच उमेदवार फायनल!

संजय राऊतांनी कापला संभाजीराजेंचा पत्ता, सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधूनच उमेदवार फायनल!


शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे.

शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे.

शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे.

    मुंबई, 23 मे : राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरून  जोरदार रस्सीखेच सुरू होती. छत्रपती संभाजीराजे  (Sambhaji Raje)  यांना शिवसेनेनं ऑफर दिली होती. पण, संभाजीराजेंनी सेनेची ऑफर नाकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाजीराजेंना शह देण्यासाठी कोल्हापूरमधून शिवसैनिकाला उमेदवारी देण्याचे ठरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेनेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूनच सेना उमेदवार देणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.  जिल्हाप्रमुख संजय पवार र (Kolhapur Shiv Sena district President Sanjay Pawar)  यांना ही संधी दिली जाणार आहे. याआधी संजय पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसंच नगरसेवक ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास राहिला आहे. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्यामुळे कोल्हापूरमध्ये नाराजीला सामोरं जावं नाही म्हणून  संजय पवार यांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याची रणनिती सेनेनं आखली आहे. सहावा उमेदवारच कुठे आहे, संजय पवार यांचं नाव फायनल झाले आहे. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांनीच पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार आहे. पवार हा कोल्हापूरचा मावळा आहे, मावळे असता म्हणून राजे असतात, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (कामावरुन काढल्याच्या रागातून मारहाण, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार) शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर बंद, आमच्याकडून फाईल बंद झाली आहे.  संभाजीराजे यांचा आम्ही आदर ठेवतो, त्यांच्या कुटुंब आणि गादीविषयी कायम आदर ठेवत असतो. सहाव्या जागेसाठी तुम्ही उमेदवार व्हा, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते मैदानात आले आहे, जर कुणाकडे 42 संख्याबळ असेल त्यांनी पाठिंबा द्यावा. संभाजीराजे यांचा विचार करून शिवसेनेनं ऑफर दिली होती. शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असा आम्ही प्रस्ताव दिला होता, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या