'संभाजीनगर' आमच्या हृदयात.. 'त्या' बॅनरबाजीवरून शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं

औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे.

औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे.

  • Share this:
मुंबई, 24 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरणावरून आता मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. 'प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं (Aurangabad City) नाव छत्रपती संभाजीनगर Chhatrapati  Sambhajinagar) करा नाहीतर..., असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यावरून आता शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना डिवचलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Shiv Sena Leader Anil Parab) म्हणाले, औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर 'नाहीतर' असं लिहिलेले आहे. असे अनेक 'नाहीतर' आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. हेही वाचा.. आश्रमाबाहेर रात्रभर थांबली होती महिला, व्यवस्थापनाला फुटला नाही पाझर अनिल परब यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मनसेच्या औरंगाबाद शहरातील बॅनरबाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मनसेची बॅनरबाजी ही केवळ निवडणुकीच्या तोंडावर आहे. 'संभाजीनगर' हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही अनिल परब यांनी सांगितलं. मराठा संघटनेत वेगवेगळे मतप्रवाह... राज्य सरकारनं SEBC अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोट्यातून मराठा विद्यार्थ्यांना यंदा शैक्षणिक प्रवेश मिळणार आहे, असंही सरकारनं जाहीर केलं आहे. मात्र, यावर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावरून मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. अनिल परब म्हणाले, मराठा संघटनांनी एकत्र येवून निर्णय घ्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही मुलं कोर्टात जात आहेत . त्यांना ते द्यावं लागत आहे. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही. तर गरीब घटकासाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पडणार नाही. नाणारवरून काय म्हणाले परब... नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असे वक्तव्य राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलं आहे. त्यावर अनिल परब यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक आमदारांचे ते वैयक्तिक मत आहे. नाणार जैतापूरची भूमिका हे पक्षप्रमुख मांडत असतात. यू टर्न घेतला असं काही नाही, असंही परब यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा...नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण पुढील काही दिवस धोक्याचे काळजी घ्या... अनिल परब यांनी सांगितलं की, येणारे काही दिवस धोक्याचे आहेत. त्यामुळे आणखी काळजी घ्यावी लागणार आहे. रात्री सोशल डिस्टन्शिंगचा फज्जा उडत होता आणि थर्डी फर्स्टला होणारी गर्दी लक्षात घेवून रात्रीचा कर्फ्यू लावण्याच सरकारनं निर्णय घेतला आहे. रात्रीचाच कोरोना असतो का? असं म्हणणाऱ्यांची मला किव येते, असं सांगून अनिल परब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं नाव न घेतला पलटवार केला.
Published by:Sandip Parolekar
First published: