Home /News /mumbai /

महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना आणि रिपाइंत जुंपली

महापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना आणि रिपाइंत जुंपली

तब्बत तीन महिन्यानंतर उल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन महासभा पार पडली.

उल्हासनगर, 19 डिसेंबर: उल्हासनगर महापालिकेत महापौर ( Ulhasnagar Municipal Corporation Mayer) आणि उपमहापौर (Deputy Mayer) यांच्या खुर्चीवर आता नवा वाद उफाळून आला आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या एकसारख्याच खुर्चीमुळे सत्ताधारी शिवसेना (Shiv sena) संतापली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर रिपाइं आठवले (RPI Athavale Group) गटाचा उपमहापौर आहे. तब्बत तीन महिन्यानंतर उल्हासनगर महापालिकेची ऑनलाइन महासभा पार पडली. यावेळी सभागृहात शिवसेनेच्या महापौर लीलाबाई आशान आणि उपमहापौर भगवान भालेराव यांची एक सारखी आसन व्यवस्था होती. ही बाब लक्षात येताच महासभा पार पडल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावर आक्षेप घेतला. हेही वाचा...राज्यात काँग्रेस सत्तेकरता लाचार, सोनियांची झाली दिशाभूल; विखे पाटलांचा घणाघात महापौर हे महापालिकेतील सर्वोच्च पद असून उपमहापौरांनी देखील महापौरांसारखी खुर्ची आणून महापौरपदाचा अपमान केला आहे. तो कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. ऑनलाइन पद्धतीने होत असलेल्या महासभेत नगरसेवकांना बोलण्यापासून रोखणे, बोलू न देणं, ही उपमहापौरांची दादागिरी शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा देखील राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे. दरम्यान मी महापौरांचा अपमान केला नाही. प्रत्येक महापालिकेत महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि सचिव यांच्या एक सारख्या खुर्च्या असतात. महापौर आणि उपमहापौरांच्या खुर्च्या वेगवेगळ्या असाव्यात, असा काही नियम असेल तर त्यांनी दाखवावा. गेल्या काही दिवसात माझी शिवसेना नेत्यांशी जवळीक वाढल्यानं काहींच्या पोटात दुखत आहे त्यामुळे हा मुद्दा उकरून काढला असल्याचं उपमहापौर भगवान भालेराव यांनी म्हटलं आहेत. हेही वाचा..."माझ्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेलं" उर्मिला मातोंडकर संतापल्या विशेष म्हणजे भाजपला महापौर, उपमहापौर पदापासून आणि सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर भाजपच्या काही नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या बाजूनं मतदान केलं होतं. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर तर रिपाइं आठवले (RPI Athavale Group) गटाचा उपमहापौर आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या