मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोदी-पवार भेटीबाबत शिवसेना आणि काँग्रेसला होती कल्पना, मलिक म्हणाले...

मोदी-पवार भेटीबाबत शिवसेना आणि काँग्रेसला होती कल्पना, मलिक म्हणाले...

 आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली.

आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली.

आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली.

मुंबई, 17 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी  (pm narendra modi) यांची भेट घेतली. पण ही भेट पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांना पूर्वकल्पना होती, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (navab malik) यांनी दिली.

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

'मागच्या वेळी भाजपने विचारलं होतं, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा स्पष्ट नाही म्हणून सांगितले होतं, आम्ही तेव्हाही भाजप सोबत गेलो नाही. त्यानंतर आम्ही महाआघाडी स्थापन केली. आज दिल्लीत मोदी यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीबाबत एच.के.पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती, असंही मलिक म्हणाले.

फिल्मी नाही रिअल! बदला घेण्यासाठी पत्नीनं केलं पतीच्या मारेकऱ्याशी लग्न, आणि....

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहे. त्यामुळे काही जणांनी पवार आणि फडणवीस भेट झाल्याची माहिती पसरवली. पण अशी कोणतीही भेट झाली नाही. ही निव्वळ अफवा आहे, असंही मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेटही पूर्वनियोजित होती.  पियुष गोयल राज्यसभा नेते झाले त्यांनी पवार यांची भेट झाली. हा एक शिष्याचाराचा भाग आहे. संरक्षणमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पवार यांच्यासोबत ए के अँटनी पण होते, सीमेवर ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर चर्चा झाली, असं मलिक यांनी सांगितलं.

'आज पंतप्रधान यांच्यासोबत ठरलेली बैठक होती. सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत आहेत त्यावर चर्चा झाली. आरबीआयला एवढे अधिकार कसे ? नव्या नियमानुसार कोणीही शेअर होल्डर शेअर विक्री करू शकतात. या नियमामुळे अनेक मोठे उद्योजक यात येतील सहकार मोडीत निघेल. त्यामुळे शरद पवार यांनी  पंतप्रधान मोदींना यांना लिहिले होते. याबद्दलच ही भेट घेतली', असंही मलिक म्हणाले.

'पाहिले नं मी तुला' मालिकेत येणार आनंदी क्षण; मनू-अनिला मिळणार बाबांचा आशीर्वाद

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी सांगितलं की, कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवावे, हा विषय अत्यावश्यक असून यावर पंतप्रधान यांनी विचार करावा याविषयी देखील बैठकीत चर्चा झाली', असंही मलिक म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Delhi, Maharashtra, Narendra modi, Nawab malik, NCP, Sharad pawar