मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

Shiv Sena vs BJP: मुंबईत राजकीय वातावरण तापलं, आशिष शेलारांविरोधात शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

Shiv Sena vs BJP: भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेनी आक्रमक बॅनरबाजी केली आहे.

Shiv Sena vs BJP: भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेनी आक्रमक बॅनरबाजी केली आहे.

Shiv Sena vs BJP: भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेनी आक्रमक बॅनरबाजी केली आहे.

मुंबई, 12 डिसेंबर: भाजप नेते (BJP leader) आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्या बद्दल अवमान करणारं आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजप (BJP) असा वाद ही सध्या सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीमध्ये शिवसेनेनं आशिष शेलार यांची खिल्ली उडवली आहे.

आता शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावलं आहे. या बॅनरवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

अशी उडवली खिल्ली

'कसं काय शेलार बरं हाय का?

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

भाजप नेते आशिष शेलारांविरोधात शिवसेनेनी आक्रमक बॅनरबाजी केली आहे.shi

आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला.

खोटा गुन्हा दाखल केला- आशिष शेलार

आशिष शेलार म्हणाले, मी माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियातही याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मी कुठल्याही व्यक्तीला, महिलेला, महापौरांना उद्देशून किंवा नाव घेऊन ते वाक्य उच्चारलं नाही. व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश हा अंगावर आल्यावर त्यापासून लपवण्यासाठी स्वत:च्या अंगावर ओढवून घेण्याचं काम शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या लोकांनी केलं. जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत. जो काही खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत मी जामीन घेतला तसेच हा एफआयआर रद्द केला पाहिजे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

First published:
top videos

    Tags: Ashish shelar, BJP, Kishori pedanekar, Shivsena