मुंबई, 5 फेब्रुवारी : शिवसेनेच्यावतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सर्वसामान्य जनतेशी गोड गोड बोलून त्यांच्याकडून मत मिळवून सत्ता स्थापन केली आहे. अच्छे दिन चे स्वप्न दाखवून लोकांना मतदान करण्याचं खोटं आश्वासन देण्यात आलं होतं.
मात्र प्रत्यक्षात सरकार येऊन सहा वर्षे झाली तरी जनतेला काहीच मिळाले नाही. प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये येणार होते, पैसे येणे तर सोडाच लोकांच्या खिशात राहिलेले थोडेफार पैसे सुद्धा केंद्र सरकार काढून घेत आहे अशी भूमिका विशाखा राऊत यांनी मांडली. शिवसेना शाखा क्रमांक 191 मधून विशाखा राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. मुख्य म्हणजे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान गाजर आणि लॉलीपॉप असं वाटप केलं. केंद्र सरकार कशा पद्धतीने तुम्हाला गाजर आणि लॉलीपॉप देत आहे याची माहिती आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन केलं अशी माहिती स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
हेही वाचा-'चांगला विकास करा', पंकजांनी दिल्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा!
भायखळा परिसरातही शिवसेनेच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. भायखळा पूर्व परिसरात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या दरवाढीचा निषेध केला. दुसरीकडे covid-19 या पार्श्वभूमीवर लागून असलेल्या नियमांच इथल्या आंदोलनकर्त्यांनी उल्लंघन केल्याचं दिसून आलं. नियमांचा मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचं दिसून आलं.
शिवसेनेच्या शिवडीतील शाखेने भाजपच्या दादर येथील कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडर एवजी चूल मांडून दरवाढीचा निषेध केला आहे. घरगुती वापराच्या गॅस वर 25 रुपये वाढले असून आता घ्या सर्वसामान्यांना परवडणारा राहिला नाही. असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.