Home /News /mumbai /

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा व्हावी, शिवसेनेचा भाजपला सल्ला

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा व्हावी, शिवसेनेचा भाजपला सल्ला

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन कोरोनाच्या काळात मोदी सरकारच्या अपयशाबद्दल वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन कोरोनाच्या काळात मोदी सरकारच्या अपयशाबद्दल वक्तव्य केलं आहे.

'राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत'

    मुंबई, 18 एप्रिल : 'पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात कोरोनासंदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी, असे हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे' असं म्हणत शिवसेनेनं आपल्या मुखपत्र असलेल्या सामनातून मागणी केली आहे. देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या संकट परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष एकत्र आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचं कौतुक करत स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे. 'संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल' असा सल्ला देण्यात आला आहे. हेही वाचा - पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत! 'राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत. भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश हे राहुल गांधी यांच्या प्रतिमाभंजनातून मिळालेले यश आहे व हे भंजन आजही सुरूच आहे, पण ‘कोरोना’ युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी आणि जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे' अशी स्तुतीसुमनं उधळत भाजपला टोला लगावण्यात आला. 'शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे' 'राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे', असंही या लेखात म्हटलं आहे.  ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’चा बोऱ्या 'चीनमधून ब्रिटिश, अमेरिकन कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे आणि हे सर्व उद्योग आता हिंदुस्थानात गुंतवणूक करतील. हे कोरोनाचे फायदे असल्याचे ‘दिवे’ काही भगत लोक पेटवत आहेत. ते मूर्खपणाचे लक्षण आहे. ही फार पुढची बात झाली. हे उद्योग येतील तेव्हा येतील. सध्या तरी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’चा बोऱ्या वाजला आहे आणि ‘स्टार्ट अप’ कधी होईल ते कोणीच सांगू शकत नाही. ‘कोरोना’च्या विषाणूपासून बचाव करण्याच्या नादात आपण देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालू शकत नाही', असा टोलाही सेनेनं लगावला आहे. हेही वाचा - गनिमी कावा करत 'ते' तुंबाडला पोहोचले, लेकरांना पाहून वर्दीतला माणूसही हादरला! ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा 'केंद्राने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी अधिक चांगल्याप्रकारे संवाद राखून हा प्रश्न सोडवायला हवा. स्थलांतरीत कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी अन्नधान्याची कोठारे मोकळी केली पाहिजेत, जीव महत्त्वाचे, असं, गांधी म्हणतात. व्हायरसच्या मागे मागे नाही, पुढे चालायला हवे. ‘रँडम टेस्टिंग’ केल्यानंतरच आपण व्हायरसच्या पुढे जाऊ शकतो, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. राहुल गांधी यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते, पण रोज संध्याकाळी देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रटाळ पत्रकार परिषदा घेऊन कोरोनाबाबत माहिती दिली जाते. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. त्यामुळेच प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, असा सल्लाही सेनेनं दिला आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Congress, Rahul gandhi, Samana

    पुढील बातम्या