'मा. उद्धवसाहेब, माफ करा राज ठाकरेंच्या मनसेला मत देणार' : 'कट्टर शिवसैनिकाचं' पत्र व्हायरल

'मा. उद्धवसाहेब, माफ करा राज ठाकरेंच्या मनसेला मत देणार' : 'कट्टर शिवसैनिकाचं' पत्र व्हायरल

'आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला', असं सांगणारा एक फलक घाटकोपरमध्ये लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : होईल नाही करत भाजप- सेना युती तर झाली, पण नाराजीचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. त्यातच आता काही ठिकाणी भाजपचा उमेदवार सेनेला मान्य नाही, त्यामुळे मतं फुटण्याची भीती आहे. उद्धव ठाकरेंना एका शिवसैनिकानं लिहिलेलं जाहीर पत्र सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. आमचं मत राजठाकरेंच्या मनसेला, असं सांगणारा एक फलक घाटकोपरमध्ये लागला आहे. 'आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक' हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत घाटकोपर पश्चिमेतून राम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरून शिवसेनेत नाराजी आहे. ती या पोस्टरमध्ये उघडपणे व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा - शिवसेनेच्या युवराजांना आघाडीचा 'हा' नेता देणार टक्कर

या फलकावर लिहिलंय, 'माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र !! किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला सेना भाजपाची युतीची उमेदवारी मिळू दिली नाही. तेव्हा आम्हाला खुप अभिमान वाटला !!! आण महिलांना अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी आपली ठाम भूमिका होता. पण आज भाजपाने युतीची घाटकोपरची उमेदवारी त्याला दिली. साहेब माफ करा. यावेळी भाजपाला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला!' - आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक.

वाचा - निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरा, संजय निरुपम यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

राम कदम यांच्या नावाला सेनेचा पहिल्यापासून विरोध होता. गेल्या वर्षीच्या दहिहंडीच्या कार्यक्रमाला वादग्रस्त केल्यामुळे राम कदम चर्चेत होते. महिलांचा अपमान करणाऱ्या त्या वक्तव्याबद्दल कदम यांना महिला आयोगाची माफी मागावी लागली होती. "कुठली मुलगी पसंत असेल तर मला सांगा. मी पळवून आणेन आणि तुम्हाला मदत करेन", असं राम कदम म्हणाले होते. त्यावरून शिवसेनेनंही भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनाच उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप आहे.

VIDEO धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर आले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं

मनसेने घाटकोपर पश्चिममधून गणेश चुक्कल यांना उमेदवारी दिली आहे. आता सेना- भाजपमधल्या विसंवादाचा फटका युतीला बसून चुक्कल यांना फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

----------------------------------------------

परळीत राष्ट्रवादीची त्सुनामी, वडिलांच्या आठवणींने धनंजय मुंडे गहिवरले

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 3, 2019, 6:47 PM IST

ताज्या बातम्या