Home /News /mumbai /

Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जात असल्यामुळे वर्षा बंगल्याबाहेर नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

    मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक (Uddhav Thackeray Facebook Live) लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी आताच राजीनामा द्यायला तयार असल्याचं सांगून बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या भाषणानंतर परिस्थितीत बदलल्याचं चित्र आहे. या भाषणानंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक (Mumbai Shivsainik On Road) रस्त्यावर उतरले आणि आपल्या नेत्याला पाठिंबा असल्याचं जणू वचनच दिलं. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंच ते यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगत होते. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक सादानंतर मुंबईभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिकाने (Politics of Emotions) रस्त्यावर उतरले. त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. आपल्या नेत्याला दुखवू नका, शिंदे साहेब परत या असं आवाहन यावेळी शिवसैनिक करताना दिसले. आम्हाला आमचे साहेब वर्षा बंगल्यावर हवे आहेत. असं यावेळी शिवसैनिक महिला म्हणताना दिसल्या. ऐकवी शिवसैनिक असल्याचा रांगडी बाणा दाखविणाऱ्या महिला आज मात्र ढसाढसा रडताना दिसल्या. शिवसेनेवर आलेलं हे संकट आमच्या घरातचं आहे. असं त्यांच्या बोलण्यातून येत होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर राहायला जात असल्यामुळे वर्षा बंगल्याबाहेर नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना आवाहन केलं तरी ते परत येण्यास तयार नाहीत, याउलट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हनंतर ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी 1, 2, 3 आणि 4 असे आकडे टाकत चार मुद्दे टाकले आहेत. त्यांच्या या चार मुद्द्यांवरुन त्यांना शिवसेनेला सत्तेत राहू द्यायचंच नाही, हे स्पष्ट होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेले चार मुद्दे नेमकं काय? 1) गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. 2) घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. 3) पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. 4) महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Mumbai, Shivsena, Viral video.

    पुढील बातम्या