Bigg Boss Marathi 2 : विदर्भाचा पठ्ठ्या शिव ठाकरेने मारली बाजी!

Bigg Boss Marathi 2 : विदर्भाचा पठ्ठ्या शिव ठाकरेने मारली बाजी!

अमरावतीचा असलेल्या शिव ने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. सुरुवातीला काहीचा शांत वाटणारा शिव नंतर खुलत गेला आणि मग त्याने आपला प्रभाव निर्माण केला तो शेवटपर्यंत.

  • Share this:

मुंबई 1 सप्टेंबर : कलर्स मराठी वाहिनीवरच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या मराठी बिग बॉस-2 चा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. या दुसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. शिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे दोघही अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यामुळे बिग बॉस कोण होणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. अंतिम पर्वात पोहोचलेल्या इतरांमध्ये शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर यांचाही समावेश होता त्यामुळे स्पर्धा सुरशीची झाली होती.शेवटच्या काही वेळात शिव ठाकरे आणि नेहा शितोळेच राहिलेत इतरांना बाहेर पडावं लागलं. त्यामुळे त्या दोघांपैकीच एक बिग बॉस होणार हे निश्चित झालं होतं. आणि शेवटी शिव हाच पर्व -2 चा बिग बॉस ठरला. महेश मांजरेकरांनी शिवचं कौतुक तर केलंच त्याचबरोबर त्याला चित्रपटात घेण्याची घोषणाही केली.

बॉलिवूड डेब्यूनंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर होणार सिनेमाची निर्मिती?

सतत 100 दिवस यातल्या सदस्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये नाना खटपटी लटपटी केल्या केल्या. दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी जोराचे प्रयत्न केले. यातून अनेक वाद निर्माण झाले. या प्रत्येक टप्प्यात शिव आणि नेहा हे कायम वरचढ राहिले होते. अभिनेत्री किशोरी शहाणे या  शायनिंग स्टार अवॉर्ड च्या मानकरी ठरल्या. 100 दिवस अनेक वाद विवादांनी बिग बॉस गाजला होता.सुरेखा पुणेकर यांच्या धमाकेदार कलाविष्काराने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढली.

अमरावतीचा असलेल्या शिव ने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. सुरुवातीला काहीचा शांत वाटणारा शिव नंतर खुलत गेला आणि मग त्याने आपला प्रभाव निर्माण केला तो शेवटपर्यंत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 11:33 PM IST

ताज्या बातम्या