Home /News /mumbai /

एकनाथ शिंदे यांच्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी कायम राहिली, सूत्रांची माहिती

एकनाथ शिंदे यांच्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी कायम राहिली, सूत्रांची माहिती

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला शिवसेना आमदारांचा गट राज्यसभा निवडणूकीत संजय राऊत यांना मतदान करणार नव्हता. संपूर्ण तयारी झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यास नकार दिला.

    मुंबई, 23 जून : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आता अनेक गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कलह देखील हळूहळू समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) शिंदे समर्थकांचा गट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मतदान करणार नव्हता. ज्यामुळे संजय राऊत यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतं, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेला शिवसेना आमदारांचा गट राज्यसभा निवडणूकीत संजय राऊत यांना मतदान करणार नव्हता. संपूर्ण तयारी झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यास नकार दिला. अन्यथा संजय राऊत यांचा पराभव झाला असता. निवडणूक संपल्यावर याबाबत उद्धव ठाकरे यांना ही माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे संजय राऊत यांची खासदारकी कायम राहिली, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. 'शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच'; ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावताच अनिल परब यांची प्रतिक्रिया बंडखोर आमदारांनी परत यावं- संजय राऊत एकनाथ शिंदेकडून वारंवार भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी याला कधीच समर्थन दिलं नाही. दरम्यान ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी आता बंडखोर आमदारांना 24 तासात परत येण्याचं आवाहन केलं आहे. तुम्ही परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आपल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी मोठे खुलासे केले आहेत. आमदारांचं अपहरण करून भाजपने त्यांना आपल्यासोबत नेलं आहे. सर्वांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक आता वेळ निघून गेली दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मात्र संजय राऊत यांनी संजय राऊत यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता वेळ निघून गेली आहे, गाडी खूप पुढे निघून गेली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या