Home /News /mumbai /

मनसेची शिंदे सरकारला टाळी? मोठा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, सेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ

मनसेची शिंदे सरकारला टाळी? मोठा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, सेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ

'राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत.  राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत'

'राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत. राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत'

'राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत. राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत'

    मुंबई, 06 जुलै : राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे. आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन भेट घेतली. माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत.  या भेटीच्यावेळी सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर ही उपस्थित होते. (VIDEO : मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज) राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले की, 'राज्यात सेना-भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत.  राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिला मी आभारी आहे', अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे,शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला मत दिलं होतं. एवढंच नाहीतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तोंडभरून कौतुकही केलं होतं. संजय राऊतांबद्दल सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. संजय राऊत यांनी थेट मनोहर जोशी यांचे घर जाळण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप सरवणकर यांनी केला होता. (बंडखोरी केलेल्या शंभुराज देसाईंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार टीका) 'मी शिवसेनेत मागच्या कित्येक वर्षांपासून काम करत आहे. मातोश्री ज्यावेळी अडचणीत येते त्यावेळी असेल त्या ठिकाणाहून आम्ही शिवसैनिक घेऊन हजर राहायचो. ज्या संजय राऊत सामना कार्यालयात बसतात ते कार्यालय आम्ही बांधले आहे. त्या कार्यालयाला पाणी पुरवण्याचे काम माझ्यासह अन्य शिवसैनिकांनी केले आहे. या संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी आम्हाला आदेश दिल्याचाही त्यांनी थेट आरोप करत गौप्यस्फोट केला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या