Home /News /mumbai /

शिवसेनेच्या 14 आमदारांना शिंदे गटाकडून अपात्रतेची नोटीस, या कारणामुळे आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं

शिवसेनेच्या 14 आमदारांना शिंदे गटाकडून अपात्रतेची नोटीस, या कारणामुळे आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं

भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे

    मुंबई 05 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे (Maharashtra Political Updates). शिवसेनेचे नवे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उद्धव गटावर कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली आहे. आमचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव दिलेलं नाही. मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी उचललं पाऊल; पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा गोगावले पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. सोमवारी शिंदे सरकारने विधानसभेत फ्लोअर टेस्ट पास केली आहे. त्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला. शिंदे सरकार यांना फ्लोर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली. दरम्यान यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे (Aaditya Thackeray's Reaction on Disqualify Notice). "आमदार सुनील प्रभू हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद आहेत आणि त्यांचाच व्हीप कायदेशीर आहे , शिवसेनेच्या आमदारांना त्यांचाच व्हीप लागू होईल", अशी भूमिका युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. मी शिवसेना आमदार आणि सर्व सामान्य शिवसैनिकांसोबतच कायम उभा राहीन, असंही ते म्हणाले. What is Whip: व्हिप म्हणजे काय? त्यानुसार नेमकी कोणावर कारवाई होणार? शिंदे गट की शिवसेना? व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी दुपारीच स्पष्ट केलं होतं. फ्लोअर टेस्टमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी शिंदे यांच्या विरोधात मतदान केलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनीही शिंदे गटाला अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. रविवारी त्यांनी शिवसेनेवर सभापतीपदाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप केला होता. दोन्ही बाजूंकडून तक्रारी आल्याची पुष्टी सभापती कार्यालयाने केली. त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. या तक्रारींची चौकशी होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या