Home /News /mumbai /

लय भारी मुंबईकर! आफ्रिकेत 5895 मी. उंच शिखरावर फडकवला भारताचा 71 फूट तिरंगा

लय भारी मुंबईकर! आफ्रिकेत 5895 मी. उंच शिखरावर फडकवला भारताचा 71 फूट तिरंगा

मुंबईच्या या तरुणाला सलाम, डोळ्यांनी शिखर नाही दिसलं पण आपला तिरंगा फडकताना दिसला. पाहा VIDEO

    स्नेहल पाटकर (प्रतिनिधी) माऊंट किलीमांजारो, 27 जानेवारी: ''मोहिम सह्याद्रीच्या लेकराची" ह्या मोहीमेअंतर्गत गिर्यारोहक शिलेदार सागर विजय नलवडे यांनी जगातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेलं आफ्रिका खंडातील सर्वात उंच 5895 मीटर उंचीचं शिखर माऊंट किलीमांजारो सर केलं आहे. शिखरावर ऊणे 15 ते 20 तापमान असताना आणि बर्फवृष्टि होत असतानाही 71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी 71 फूट तिरंगा फडकवला. त्यांनी भारतीय संविधान, स्वराज्याची राजधानी रायगडावरील माती, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या शिखरावर नेऊन महाराजांना आणि सर्व भारतीयांना अभिवादन केलं. शिलेदार अॅडव्हेंचर इंडियाकडून हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मोहिमेत शिलेदार सागर यांच्यासोबत अर्नाळा, वसई येथील रोहित पाटिल, इंदापुर येथील योगेश करे, आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस जवान आशिष दिक्षित हे सहभागी झाले होते. या मोहिमेसाठी 360 एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर श्री आनंद बनसोडे यांचे सहकार्य लाभलं. 'पुढील पाच खंडातील पाच शिखरे मला सर करायची आहे. पण या हिमशिखराच्या मोहिमा खुप खर्चिक व अवघड आहेत त्या मोहिमा करणे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला खुप आव्हानात्मक आहे. पण मी जिद्दीने या मोहिमाची तयारी करत असुन मला महाराष्ट्रातील सर्वाचे सहकार्य लाभत आहे. मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती याचे बहुमोल मार्गदर्शन आणि मदत मिळाली असून या मोहिमेसाठी कागलचे राजे समरजितसिह राजे आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी आणि महाराष्ट्रातील सर्व सह्याद्रि मित्रांनी बहुमोल असे आर्थिक सहकार्य केलं.' असल्याचं गिर्यारोहक शिलेदार सागर विजय नलवडे यांनी सांगितलं. यापूर्वी 15 ऑगस्ट 2019 रोजी युरोप खंडातील रशिया येथील सर्वात उंच शिखर 5642 मीटर माऊंट एलब्रुस बेस कॅम्पवर हे शिखर सर केलं होतं. त्यांच्या या मोहिमेची दखल वेगवगळ्या रेकॉर्ड बुकने घेतली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Mumbai, Treking

    पुढील बातम्या