'इंद्राणीला तिच्या दोन्ही मुलांना मारायचं होतं !' -ड्रायव्हरची कोर्टात माहिती

'इंद्राणीला तिच्या दोन्ही मुलांना मारायचं होतं !' -ड्रायव्हरची कोर्टात माहिती

माझी अनेक गुपितं त्यांना माहित होती, म्हणूनच मी माझ्या मुलांना मारणार आहे, असंही इंद्राणीने मला खासगीत अनेकदा सांगितलं होतं. ' असं ही ड्रायव्हर शामावर राय याने आज कोर्टात सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : शीना बोरा हिचा खून हा इंद्राणी मुखर्जी आणि तिचा दुसरा संजीव खन्ना या दोघांनीच केला असून त्यांना मिखाईल यालाही मारून टाकायचं होतं, अशी धक्कादायक माहिती इंद्राणीचा ड्रायव्हर शामावर राय याने आज कोर्टाला दिली. पोलिसांनी शामावर रायला या खून प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवलंय. त्यानंतर त्याने या खूनामागचं रहस्यच कोर्टासमोर उघड केलंय. शीना बोराच्या खून प्रकरणात मदत करण्यासाठी इंद्राणीने आपल्याला नेमके कसे पैसे दिले यासंबंधीचे बॅक व्यवहारही शामावरने प्रथमच पोलिसांसमोर उघड केलेत.

'इंद्राणीची मुलगी शिना बोरा आणि मुलगा मिखाईल हे दोघेही तिची समाजात बदनाम करत होते. तसंच शीना ही माझी बहिण नसून मुलगी आहे हे नातं समाजासमोर उघडं करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल करत होती. माझी अनेक गुपितं त्यांना माहित होती, म्हणूनच मी माझ्या मुलांना मारणार आहे, असंही इंद्राणीने मला खासगीत अनेकदा सांगितलं होतं. ' असं ही ड्रायव्हर शामावर राय याने आज कोर्टात सांगितलं.

शामाराव राय आपल्या साक्षीत पुढे म्हणतो, ' इंद्राणीला खरंतर शीना आणि मिखाईल एकाचवेळी मारायचं होतं. पण म्हणूनच इंद्राणीला प्रत्यक्ष खूनाच्या दिवशी मिखाईलला भरपूर दारू पाजली पण तरिही तो पूर्णपणे बेशूद्ध झाला नाही त्यामुळे मग संजीवने इंद्राणीला मिखाईलला तिथेच सोडून देण्याचा सल्ला दिला. कदाचित म्हणूनच मिखाईलचा जीव वाचू शकला. शीना बोरा आणि पीटर मुखर्जीचा मुलगा राहूल यांचं अफेअरही इंद्राणीला मान्य नव्हतं म्हणूनच इंद्राणीने तिला संपवलं '

शीना बोरा खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनलेल्या शामावर रायची हा जबाब इंद्राणीला शिक्षा देण्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच इंद्राणी यावर नेमका प्रतिवाद करते हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

24 एप्रिल 2012 रोजी रायगडच्या जंगलात शीना बोराचा मृतदेह सापडल्यानंतर कार्पोरेट जगतातलं हे हायप्रोफाईल हत्याकांड उघड झालं होतं. आता त्याची कोर्टात सुनावणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 04:22 PM IST

ताज्या बातम्या