मुंबई, २० मे : शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora murder case) प्रकरणात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला अखेरीस जामीन मिळाला आहे.इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukherjea) सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज साडे सहा वर्षांनंतर मुखर्जी जेलबाहेर आली.यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना हात दाखवत आणि हसत मुखर्जी कारमध्ये बसून घराकडे रवाना झाली.
साडे सहा वर्षांपासून शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी अखेरीस आज जेलबाहेर आली. कोर्टाने जामीन दिल्यानंतर दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानंतर आज संध्याकाळी इंद्राणी मुखर्जीची जेलमधून सुटका करण्यात आली. जेलमध्ये असताना इंद्राणी मुखर्जीचे केस पूर्ण पांढरे झाले होते. पण आज केस काळे करून हसत मुद्रेनं मुखर्जी जेलबाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर आपल्या वकिलांना भेटल्या आणि मर्सिडीज गाडीत बसून मुखर्जी घराकडे रवाना झाली.
काय आहे शीना बोरा हत्याकांड प्रकरण?
2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला. 2015 मध्ये तीन वर्षांनी या हत्येचा मुलगडा झाला. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला अटक केल्यावर सर्व प्रकरण समोर आलं. इंद्राणी मुखर्जीने शीनाला मुंबईतील वांद्रे परिसरात बोलावून तिचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील जंगलात नेऊन टाकला.
पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिच्याशी आई इंद्राणी मुखर्जीचा वाद व्हायचा आणि त्यातूनच या हत्येचं षडयंत्र रचल्याचं समोर आलं. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा ड्रायवर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी आणि पहिला पती संजीव खन्ना याला अटक करण्यात आली.
इंद्राणीने शीना ही आपली मुलगी नाही तर बहीण असल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या पतीचा मुलगा राहुल याच्यासोबत शीनाचे प्रेमसंबंध होते.
पीटर मुखर्जी यांना 2020 मध्ये जामीन मंजूर झाला. कोर्टाच्या सुनावणी दरम्यान इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दोघांचा घटस्फोट झाला.
आईनेच रचला मुलीच्या हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी आणि शीनाचे संबंध चांगले नव्हते, शीना बोरा ही इंद्राणीच्या पहिल्या पतीची अपत्य होती, इंद्राणी शीनामध्ये दररोज वाद व्हायचे. इंद्राणीने तिच्या ड्रायव्हरसोबत शीनाच्या हत्येचा कट रचला. 2 मे 2012 रोजी इंद्राणीने शीनाला भेटण्यासाठी वांद्रे येथे बोलावले. मग तिला गाडीत बसवले. कारमध्ये ड्रायव्हर श्याम राय व्यतिरिक्त एक व्यक्ती आणि एक थाई होता. यानंतर शीनाचा कारमध्येच गळा दाबून खून करण्यात आला. इंद्राणीने चालक मनोहर राय याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. ड्रायव्हर रायने मृतदेह मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या रायगडच्या जंगलात नेला. आधी त्याने जाळण्याचा प्रयत्न केला. पण, नंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरुन तो परतला.
या प्रकरणी पोलिसांनी इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी आणि मुलगा राहुल यांचीही चौकशी केली. नंतर पीटरला अटक करण्यात आली. पीटर मुखर्जी हे भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पीटरने 2002 मध्ये इंद्राणीशी लग्न केले. पीटरचे हे दुसरे लग्न होते. इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना यालाही कोलकाता येथून अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.