Elec-widget

पसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट

पसंत नाही म्हणून 'तीने' होणाऱ्या नवऱ्याला खाऊ घातले विषारी चॉकलेट

ज्या मुलाशी लग्न ठरलंय, तो पसंत नाही म्हणून मुलीने चक्क त्या भावी वराला विषारी चॉकलेट खाऊ घालून त्याची हत्या केली.

  • Share this:

भिवंडी, 20 ऑगस्ट : ज्या मुलाशी लग्न ठरलंय, तो पसंत नाही म्हणून मुलीने चक्क त्या भावी वराला विषारी चॉकलेट खाऊ घालून त्याची हत्या केली. भिवंडी परिसरात ही घटना घडली असून, संबंधित तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग परिसरात रहाणाऱ्या समरीन अली अन्सारी हिच्याशी लग्न ठरले होते. परंतु तिने अरकमला अपशब्द बोलून तो आपणास पसंत नसल्याचे मोबाईलवरून सांगितले.

मेरे जिंदगीसे चले जाओ, मैने दिया हुआ जहर खाओगे, असे सांगत समरीनने त्याला विषारी पदार्थ लावलेला चॉकलेट खाण्यास दिले. ते चॉकलेट खाल्ल्यानंतर अरकमची प्रकृती बिघडली. त्याला ताबडतोब उपचारार्थ रुग्णालायत हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अरकमच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीसांनी मोबाईलमधील संभाषणाची क्लिप हस्तगत केली असून, अरकमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल समरीन हिच्याविरोधात गुन्हा नोंदऊन तिला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...