विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जाहीर केले 2 उमेदवार

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जाहीर केले 2 उमेदवार

राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : विधानपरषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या गोटात हालचाली सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपनंतर आता राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार असणार आहेत.

'श्री. शशिकांत शिंदे, सातारा आणि श्री. अमोल मिटकरी, अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे,' असं ट्वीट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने दोन उमेदवार दिले असून त्यातील एक मराठा तर दुसरा उमेदवार ओबीसी समाजातील आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील उमेदवार देवून राष्ट्रवादीने जातीय तसंच प्रादेशिक समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला आहे.

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात

काँग्रेसने आपल्या दुसऱ्या उमेदवारीची घोषणा केल्यामुळे आता विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात असणार आहेत. उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 14 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे न घेतल्यास निवडणूक अटळ असणार आहे.

कोणत्या पक्षाकडून कोण आहे मैदानात?

शिवसेना

उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे

भाजप

डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील

काँग्रेस

राजकिशोर मोदी आणि राजेश राठोड

राष्ट्रवादी

शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 10, 2020, 2:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading