S M L

'बेस्ट'चा संप मागे घेणार का? शशांक राव यांची प्रतिक्रिया

बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 01:09 PM IST

'बेस्ट'चा संप मागे घेणार का? शशांक राव यांची प्रतिक्रिया

मुंबई, 12 जानेवारी : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला बेस्टचा संप अद्यापही सुरू आहे. 'प्रशासनासोबत सकारात्मक झाली. त्यांनी आमचे मुद्दे ऐकून घेतले, पण संप सुरू राहील आणि संप सुरू असतानाच वाटाघाटी सुरू राहतील,' अशी प्रतिक्रिया कामगार नेते शशांक राव यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाचव्या दिवशीही संप सुरू ठेवला आहे. या संपाला मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या युनियननेही पाठिंबा दिला आहे. अनेक मॅरेथॉन बैठकांनंतर अजूनही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा निघालेला नाही.

बोनस, वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाला आधी सत्ताधारी शिवसेनेने नैतिक पाठिंबा दिला होता, मात्र एकाच दिवसात हा नैतिक पाठिंबा सेनेने काढून घेतला. यामुळे संतापलेल्या शिवसेना युनियन सदस्यांनी सामूहिक राजीनामी दिले आहेत. कर्मचाऱ्यांना मेस्मा आणि सेवा निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्याने राज्य सरकार, पालिका, बेस्ट प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. यामुळे गेले पाच दिवस संप सुरू असला तरी त्याबाबत अद्याप कोणातही तोडगा निघालेला नाही.VIDEO : 'संप न मिटवल्यास शिवसेना-भाजपला देशोधडीला लावू', मराठी माणूस संतापला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 01:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close