Home /News /mumbai /

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आकडा वाढला

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठी घट, कोरोनामुक्त होणाऱ्यांचाही आकडा वाढला

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सातत्याने कोरोनाचा आलेख (Maharashtra Covid-19 graph) कमी होतोय. त्यामुळे सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार आणि स्थानिका पालिकांनी मिळून जे सातत्याने काम केलं त्यामुळे हा आलेख घसरत असून त्याची 5 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 80 हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे.

    मुंबई 06 डिसेंबर: राज्यात दिवाळीनंतर थोडा वाढलेला कोरोनाचा आलेख आता पुन्हा घसरणीला लागला आहे. रविवारी दिलासा देणारी आकडेवारी समोर आली असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं असून 7 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 17 लाख 23 हजार 370वर गेला आहे. तर Recovery Rate 93.04 एवढा झालाय. गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 757 नव्या रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या ही 18 लाख 52 हजार 266 एवढी झालीय. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 80 हजारांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ही घसरण सुरू असल्याने दिलासा मिळाला आहे. फायझर (Pfizer) ने विकसित केलेल्या कोरोना लशीच्या (Coronavirus Vaccine) वापराला भारतात परवानगी मागितली आहे. कंपनीच्या भारतीय शाखेने याबाबतचा अर्ज भारतीय औषधी महानियंत्रक DCGI (डीसीजीआई) कडे केला आहे. मात्र हा अर्ज करताना कंपनीने जी अट घातली त्या अटीमुळे सर्व घोडं अडलं असून त्यामुळे फायझरच्या लशीला (Pfizer corona Vaccine) परवानगी मिळण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे. फायझरला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली आहे. तर बहरिननेही परवानगी दिली आहे. तर अमेरिकेतही कंपनीनी आणीबाणीच्या परिस्थितीत लशीच्या वापराला परवानगी मिळावी असा अर्ज केला आहे. भारतात अर्ज करताना कंपनीनी एक अट घातली आहे. या औषधामुळे जर एखाद्या रुग्णावर गंभीर दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार नाही. ती जबाबदारी सरकारे घ्यावी असं कंपनीने म्हटलं आहे. पुणेकर ठरला Asian Of the Year; कोरोना विरोधी कामगिरीबद्दल पुनावालांचा सन्मान या अटीमुळे फायझरला भारतात परवानगी मिळाण्याची शक्यता नसल्याचं मत व्यक्त होत आहे. औषध नियामकांकडे दाखल केलेल्या अर्जात कंपनीने भारतात आयात आणि आपत्कालीन स्थितीत वापरण्याची परवानगी मागितली आहे. याशिवाय ड्रग्स अॅण्ड क्लिनिकल ट्रायल नियम 2019 च्या विशेष तरतुदीनुसार भारतातील लोकसंख्येचा विचार करता क्लिनिकल चाचण्यांमधून सूट मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी हा अर्ज करण्यात आला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या