Home /News /mumbai /

शेअर बाजारातील 1200 अंकांच्या घसरणीमुळे 5.4 लाख कोटी बुडाले !

शेअर बाजारातील 1200 अंकांच्या घसरणीमुळे 5.4 लाख कोटी बुडाले !

जागतिक शेअर बाजारातील मंदीमुळे भारतीय शेअर बाजार तब्बल 1274 अंकांनी कोसळलाय, निप्टी देखील 390 अंकांनी घसरलाय. शेअर मार्केटमधील गेल्या दोन वर्षातील आजच्या या सर्वात निच्चांकी पडझडीमुळे गुंतवणूदारांचे तब्बल 5.4 लाख कोटींचं नुकसान झालंय.

पुढे वाचा ...
06 फेब्रुवारी, मुंबई : जागतिक शेअर बाजारातील मंदीमुळे भारतीय शेअर बाजार तब्बल 1274 अंकांनी कोसळलाय, निप्टी देखील 390 अंकांनी घसरलाय. शेअर मार्केटमधील गेल्या दोन वर्षातील आजच्या या सर्वात निच्चांकी पडझडीमुळे गुंतवणूदारांचे तब्बल 5.4 लाख कोटींचं नुकसान झालंय. गेल्या आठवड्यातही केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात घसरण झाली होती. गेल्या गुरूवारी आणि शुक्रवारीही शेअर बाजारात तब्बल 800 अंकांची घसरण झाल्याने त्यावेळी 4.5 लाख कोटींचं नुकसान झालं होतं. शेअर मार्केटमधील या घसरणीमुळे भारतीय रुपया देखील डॉलरच्या तुलनेत 29 पैशांनी खाली आलाय. पण केंद्र सरकारने शेअर बाजारातली ही घसरण आंतरराष्ट्रीय मार्केटमधील मंदीमुळे झाल्याचा दावा केलाय. गेल्या आठ दिवसातल्या घसरणीमुळे बीएसई निर्देशांक 33,578 अंकांवर तर निफ्टीचा निर्देशांक हा 10,305 अंकांपर्यंत उतरलाय. विशेष म्हणजे बजेट सादर होण्याआधीच शेअर बाजाराने 36 हजारांपर्यंत उसळी मारली होती. पण अमेरिका शेअर मार्केटमधील मंदी आणि अर्थसंकल्पातील निराशाजनक तरतूदींमुळे शेअर बाजारात पुन्हा निच्चांकी घसरण सुरू झालीय. जपानचा शेअर बाजारही 1196 अंकांनी घसरलाय. अमेरिका शेअर बाजारातही गेल्या सहा वर्षातली निच्चांकी घसरण झालीय. अमेरिका शेअर बाजारातही 7 टक्क्यांची घसरण झालीय. अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम आज जगभरातल्या बाजारात बघायला मिळत आहेत. भारतीय वेळेनुसार काल रात्री डाऊजोन्स निर्देशांक 4.6 टक्के अर्थात 1600 अंकांनी कोसळून 24 हजार 345 वर बंद झाला. त्यानंतर आज सकाळी उघडलेला जपानची राजधानी टोकियोच्या शेअर बाजारातही विक्रमी पडझड झालीय. बजेट वरील प्रतिक्रिया आणि अमेरिकन शेअर बाजारातील मोठी घसरण ही दोन प्रमुख कारणं या पडझडीसाठी सांगितली जातात. पुढच्या वर्षभरातही शेअर बाजारातली ही अनिश्चितता कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी वर्तवलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांचे चांगलेच धाबे दणाललेत.  
First published:

Tags: BSE, Share market, जेटली, शेअर बाजार

पुढील बातम्या