26 एप्रिल : शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरू आहे. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने 30 हजाराचा पल्ला ओलांडला असून निफ्टी पहिल्यांदाच 9,337.90 या ऐतिहासिक स्थानी पोहोचला. आशिया मार्केटमधील सलग चांगल्या स्थितीचा मुंबई शेअर बाजारात परिणाम दिसत आहे.
जागतिक भांडवली बाजारातील साथ देणाऱ्या निर्देशांकांनी मंगळवारी मोठी सत्रझेप नोंदविली होती. मंगळवारी निफ्टी पहिल्यांदाच 9,300च्या विराजमान झाला होता. तर सेन्सेक्स 287.40 अंश वाढीसह 29,943 वर विराजमान झाला होता. बुधवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला.
सेन्सेक्स 111.83 अंशानी वाढून 30,055.07वर असून मोर्चा 2015नंतर सेन्सेक्सने पहिल्यांदाच 30 हजाराचा पल्ला ओलांडला आहे. तर निफ्टीने 31 अंशाची झेप घेत 9,331चा पल्ला ओलांडला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा